Credit Card Guide ( photo-social media )
Credit Card Guide : आजच्या या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड सारख्या सेवांनी आर्थिक जीवन सोईस्कर केले आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही बिल पेमेंट एका स्वाइपने करू शकता. म्हणजेच तुम्ही रोख रक्कम सोबत ठेवण्यापेक्षा बिल पेमेंट असो, खरेदी असो किंवा प्रवास जलद गतीने करू शकता. तसेच, ऑनलाइन शॉपिंग सुद्धा अधिक सुलभ झाल्या आहेत. अगदी, जर कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तरी तुम्ही ते तुमच्या बँकेत त्वरित ब्लॉक करून आर्थिक नुकसान टाळू शकता. परंतु, एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की, जर तुम्ही ती सुज्ञपणे वापरली नाही तर, तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: 22 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये, जाणून घ्या सविस्तर
रिवॉर्ड, कॅशबॅक सारखे फायदे
या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड केवळ वापरकर्त्यांना सेवाच देत नाहीत तर वापरकर्त्यांसाठी फायदेशीर सुद्धा आहे. अगदी किराणा सामान खरेदी करण्यापासून ते वीज बिल भरण्यापर्यंत, अनेक कंपन्यांनी वापरकर्त्यांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक सारख्या फायदेशीर गोष्टी ठेवल्या आहेत. गिफ्ट व्हाउचर आणि सवलतींसाठी या पॉईंट्सचा वापर होऊ शकतो. याव्यतिरिक्त, भागीदार ब्रँडवर विशेष सवलती सुद्धा देण्यात येतात, ज्यामुळे दैनंदिन खर्चात वापरकर्त्यांची बचत होते.
योग्य वापरामुळे वाढतो क्रेडिट स्कोअर
वापरकर्त्यांनी जर क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरली तर, क्रेडिट स्कोअर मजबूत होऊ शकतो. ज्यामुळे भविष्यातील कर्जे आणि इतर आर्थिक फायद्यांमध्ये सुद्धा मदत होऊ शकते. आपत्कालीन निधी म्हणून देखील क्रेडिट कार्डचा फायदा होऊ शकतो. तथापि, तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक असून उशिरा पेमेंट करणे किंवा निष्काळजीपणा वापरकर्त्यांच्या क्रेडिट स्कोअरला हानी पोहोचवू शकतो.
हेही वाचा : US Visa Rule: अमेरिकेचा व्हिसा मिळवणे झाले कठीण! लठ्ठपणासह ‘या’ गंभीर आजारांमुळे अर्ज फेटाळला जाणार
उच्च व्याजदर ठरू शकतो धोका
क्रेडिट कार्ड्समधील उच्च व्याजदर हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे म्हंटले जाते. तुम्ही पेमेंट वेळेवर केले गेले नाही तर, तुमचे थकबाकीवरील व्याज वेगाने वाढू शकते. याशिवाय, अनेक कार्ड्समध्ये जॉइनिंग फी, प्रक्रिया शुल्क किंवा वार्षिक फी यासारखे छुपे खर्च सुद्धा असू शकतो. वारंवार क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक दबाव वाढतो. वापरकर्त्याने क्रेडिट कार्ड व्यवस्थित वापरे तर त्याचे जास्त फायदेच आहेत. पण, जर त्याचा वापर निष्काळजीपणाने केला तर मात्र कर्जाचा भार वाढू शकतो. म्हणून, क्रेडिट कार्ड वापरताना अटी, व्याजदर आणि शुल्क जाणून घेणे अधिक महत्वाचे आहे.






