नववर्षात श्रीमंत व्हायचंय... या 18 शेअर्सवर ठेवा लक्ष, प्रत्येक स्टॉकवर मिळेल मोठा नफा!
नागपुरातील एका रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनीने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. केवळ दोन वर्षांत शेअरची किंमत 3000 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. केवळ एका वर्षात शेअर 1000 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. ही कंपनी केसर इंडिया आहे. तिला केसर लँड्स असेही म्हणतात.
2022 मध्ये कंपनी झालीये सूचीबद्ध
केसर इंडिया 12 जुलै 2022 रोजी शेअर बाजारावर सूचीबद्ध झाली. लिस्टिंगच्या दिवशी बीएसईवर शेअर्सची बंद किंमत 174 रुपये होती. तेव्हापासून शेअरची किंमत 492 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2500 कोटींवर पोहोचले आहे. सप्टेंबर 2024 अखेर प्रमोटर्सकडे कंपनीत 74.99 टक्के हिस्सा होता.
हे देखील वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! फक्त 45 पैशांत मिळणार 10 लाखांचे सुरक्षा कवच!
2 वर्षात किती मिळाला परतावा
केसर इंडियाचे शेअर्स 4 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 5 टक्क्यांनी घसरून, 1030.70 रुपयांवर आले आहे. 2 वर्षांपूर्वी 3 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर 32.5 रुपयांवर होता. अशा प्रकारे 2 वर्षात 3071 टक्के परतावा मिळाला. एखाद्याने शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि शेअर्स विकले नाहीत, तर 2 वर्षांत त्यांची गुंतवणूक 3 लाख रुपये झाली असेल.
हे देखील वाचा – डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण; 1 डॉलर 84.23 रुपयांना मिळणार
त्याचप्रमाणे, 20,000 रुपयांची गुंतवणूक 6 लाख रुपये, 50,000 रुपयांची गुंतवणूक सुमारे 16 लाख रुपये आणि 1 लाख रुपयांची गुंतवणूक 31 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. शेअर्स बुधवारी (ता.६) घसरून 971 रुपयांवर आला आहे.
6 महिन्यांत मिळाला 140 टक्के परतावा
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) आकडेवारीनुसार, 2024 मध्ये केसर इंडियाचे शेअर्स आतापर्यंत 600 टक्क्यांनी वाढले आहेत. शेअर्सने 6 महिन्यांत 140 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. बीएसईवर शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,143.25 रुपये आहे, जो 30 सप्टेंबर 2024 रोजी तयार झाला होता.
आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात केसर इंडियाचा महसूल 52.63 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 10 कोटी रुपये होता. कंपनीने अद्याप एप्रिल-जून 2024 आणि जुलै-सप्टेंबर 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केलेले नाहीत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)