
Lenskart IPO Listing Price बद्दल गुंतवणूकदारांना मोठी भीती?
मागील काही वर्षांपासून IPO मधील गुणतंवणूकीत वाढ झाली आहे. त्वरित नफा कमावण्यासाठी अनेक जण आयपीओद्वारे आपले एका कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवतात आणि पुढे तो शेअर लिस्ट झाल्यानंतर लगेचच त्याची विक्री करतात. IPO मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे त्वरित नफा कमावण्याचे एक साधन मानले जात आहे. मात्र, हेच साधन गुंतवणूकदारांना तोट्यात सुद्धा आणू शकते. याचे कारण Lenskart IPO चा कमी झालेला GMP.
लेन्सकार्टचा आयपीओ बंद झाल्यानंतर, गुंतवणूकदारांना त्यांचे अलॉटमेंट आधीच मिळाले आहेत. गुंतवणूकदार आता सोमवार, 10 नोव्हेंबरला लेन्सकार्टच्या आयपीओच्या लिस्टिंगची वाट पाहत आहेत. यामुळे उद्या लेन्सकार्टच्या आयपीओची लिस्ट झाल्यावर गुंतवणूकदारांना किती तोटा किंवा फायदा होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत, चर्चा अशी रंगली आहे की कमी GMP मुळे लेन्सकार्टच्या आयपीओ तोटयात लिस्ट होईल.
लेन्सकार्टचा आयपीओ 31 ऑक्टोबर रोजी उघडला आणि 4 नोव्हेंबर रोजी बंद झाला. पियुष बन्सल यांच्या नेतृत्वाखालील चष्मा विक्रेता लेन्सकार्ट सोल्युशन्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयपीओ एकूण 28.26 वेळा सबस्क्राइब झाला. कंपनीच्या 9,97,61,257 शेअर्सच्या तुलनेत 2,81,88,45,777 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाल्या.
Todays Gold-Silver Price: काय आहेत आजच्या सोन्याच्या किंमती? भाव वाढले की घसरले? जाणून घ्या
गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असूनही, ग्रे मार्केट प्रीमियममध्ये मोठी घसरण झाली आहे. लेन्सकार्ट सोल्यूशन्स आयपीओजीएमपी 90% पेक्षा जास्त घसरला आहे. अनलिस्टेड शेअर डेटा ट्रॅक करणाऱ्या वेबसाइट्सनुसार, लेन्सकार्ट आयपीओजीएमपी रविवारी सकाळी 108 रुपयांच्या उच्चांकावरून थेट 6.5 रुपयांवर घसरला, जो लिस्टिंगपूर्वी कमी मागणी दर्शवितो.
रविवारी सकाळपर्यंत, नवीन जीएमपी 6.5 रुपयांवर आहे, जो लेन्सकार्ट शेअर्सची लिस्टिंग किंमत 408.5 रुपयांच्या आसपास असल्याचे दर्शवितो. हे किंमत प्राइस बँडच्या मर्यादेपेक्षा 1.62 टक्के किरकोळ प्रीमियम दर्शवते.
एका ब्रोकरेजने लेन्सकार्टच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांच्या चिंताही वाढवल्या आहेत. अॅम्बिट कॅपिटलने लेन्सकार्टच्या आयपीओवर “सेल” रेटिंग जारी केले आहे. ब्रोकरेजने लेन्सकार्टच्या शेअर्ससाठी 337 प्रति शेअरची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे, जी आयपीओच्या 402 प्रति शेअरच्या टॉप-एंड किमतीपेक्षा 16 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
Ans: GMP म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम. यामध्ये झालेली मोठी घसरण लिस्टिंगच्या दिवशी शेअर कमी प्रीमियमवर किंवा तोट्यात लिस्ट होण्याची शक्यता दर्शवते.
Ans: उच्च सबस्क्रिप्शन असूनही GMP 90% पेक्षा जास्त घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लिस्टिंगला नफा मिळेल की तोटा, याबाबत अनिश्चितता वाढली आहे.