Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wanbury Pharma Company Growth: औषधनिर्माण क्षेत्रात वानबरीची दमदार प्रगती; ९ महिन्यांत वाढला ‘इतक्या’ कोटींचा महसूल

जागतिक एपीआय बाजारपेठेत कार्यरत असलेली वानबरी लिमिटेड या औषधनिर्माण कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या तिमाही काळात दमदार कामगिरी केली आहे. ज्यामुळे कंपनीला कोटींच्या महसुलात नफा झाला आहे. सविस्तर बातमी वाचा..

  • By Priti Hingane
Updated On: Feb 12, 2026 | 01:55 PM
Wanbury Pharma Company Growth: औषधनिर्माण क्षेत्रात वानबरीची दमदार प्रगती; ९ महिन्यांत वाढला 'इतक्या' कोटींचा महसूल

Wanbury Pharma Company Growth: औषधनिर्माण क्षेत्रात वानबरीची दमदार प्रगती; ९ महिन्यांत वाढला 'इतक्या' कोटींचा महसूल

Follow Us
Follow Us:
  • वानबरीची आर्थिक वर्ष २०२६ मध्ये दमदार कामगिरी
  • API आणि फॉर्म्युलेशन व्यवसायाचा झाला दुहेरी फायदा
  • Q3 FY26 मध्ये १५.८ कोटींचा नफा
 

Wanbury Pharma Company Growth: जागतिक एपीआय बाजारपेठेत उपस्थिती असलेली आणि देशांतर्गत ब्रँडेड औषधनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेली वानबरी लिमिटेड या औषधनिर्माण कंपनीने ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीचा महसूल १६२.४ कोटी रुपये झाला, जो आर्थिक वर्ष २०२५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत १३३.५ कोटी रुपये होता. यामध्ये वार्षिक २१.७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. ही वाढ प्रामुख्याने एपीआय विक्रीत वाढलेले प्रमाण, प्रमुख उत्पादन केंद्रांमधील क्षमतेचा अधिक परिणामकारक वापर आणि फॉर्म्युलेशन व्यवसायातील स्थिर कामगिरी यामुळे झाली आहे.

ईबीआयटीडीए २६.९ कोटी रुपये राहिला, जो आर्थिक वर्ष २०२५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत १४.८ कोटी रुपये होता. म्हणजेच ८१.७ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे. कार्यक्षम खर्च व्यवस्थापन, कच्च्या मालाच्या खरेदीतील सुधारित धोरणे, उत्पादन प्रक्रियेत वाढलेली कार्यक्षमता आणि सॉल्व्हेंट रिकव्हरी प्रणालीतील सुधारणा याचा या वाढीत मोठा वाटा आहे. करोत्तर नफा (PAT) १५.८ कोटी रुपये झाला, तर आर्थिक वर्ष २०२५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत १.२ कोटी रुपये होता. म्हणजेच तब्बल १,१९४.३ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. मजबूत ऑपरेशनल कामगिरी, वाढलेले मार्जिन, खर्चातील कार्यक्षमता आणि वित्तीय खर्चात झालेली घट यामुळे नफ्यात ही झपाट्याने वाढ झाली.

8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ कधी मिळणार? अर्थ मंत्रालयाकडून मोठी माहिती समोर

आर्थिक वर्ष २०२६ च्‍या नऊमाहीत कंपनीचे महसूल ४८५.७ कोटी रुपये झाला, तर आर्थिक वर्ष २०२५ च्‍या नऊमाहीमध्‍ये ४२७.५ कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक १३.६ टक्के वाढ नोंदवली गेली. ही वाढ मुख्यतः एपीआय व्यवसायातील वाढलेल्या विक्री प्रमाणामुळे आणि फॉर्म्युलेशन विभागातील स्थिर कामगिरीमुळे झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्‍या नऊमाहीसाठी ईबीआयटीडीए (इतर उत्पन्नासह) ७७.६ कोटी रुपये राहिला, तर आर्थिक वर्ष २०२५ च्‍या नऊमाहीमध्‍ये ४८.३ कोटी रुपये होता. यामध्ये वार्षिक ६०.६ टक्के वाढ झाली आहे. सातत्यपूर्ण कार्यक्षम व्यवस्थापन, सुधारित उत्पादन मिश्रण, उत्पादन क्षमतेचा अधिक चांगला वापर आणि खर्च नियंत्रणाच्या उपक्रमांमुळे ही वाढ साध्य झाली. ईबीआयटीडीए मार्जिन १६.० टक्के राहिले, जे आर्थिक वर्ष २०२५ च्‍या नऊमाहीमध्ये ११.३ टक्के होते.

आर्थिक वर्ष २०२६ च्‍या नऊमाहीसाठी करोत्तर नफा (पीएटी) ४४.४ कोटी रुपये झाला, तर आर्थिक वर्ष २०२५ च्‍या नऊमाहीमध्ये १०.३ कोटी रुपये होता. म्हणजेच ३३२.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. कार्यक्षम ऑपरेशनल कामगिरी, सुधारलेली आर्थिक शिस्त आणि वित्तीय खर्चात झालेली घट यामुळे नफ्यात वाढ झाली. करोत्तर नफा (पीएटी) मार्जिन आर्थिक वर्ष २०२६ च्या नऊमाहीसाठी ९.१ टक्के राहिले, जे आर्थिक वर्ष २०२५ च्‍या नऊमाहीत २.४ टक्के होते.

Todays Share Market: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या मार्गावर; गुंतवणूकदारांमध्ये वाढली चिंता

वानबरी लिमिटेडचे संचालक श्री. मोहन रायना यांनी या दमदार कामगिरीबद्दल बोलताना म्हणाले, आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या महसुलात वार्षिक २२ टक्के वाढ झाली, तर आर्थिक वर्ष २०२६ च्‍या नऊमाहीमध्ये १४ टक्के वाढ नोंदवली गेली. एपीआय विभागातील मोठी मागणी आणि वाढलेले विक्री प्रमाण तसेच फॉर्म्युलेशन विभागातील मध्यम वाढ यामुळे ही वाढ साध्य झाली. तसेच, उच्च मार्जिन असलेल्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ, संतुलित उत्पादन मिश्रण, जास्त उत्पादन कार्यक्षमता (उच्च यिल्ड), सुधारित सॉल्व्हेंट रिकव्हरी प्रणाली आणि खरेदी प्रक्रियेत सुधारणा यामुळे मार्जिनमध्ये वाढ झाली. उत्तम कार्यचालन कामगिरी आणि वित्तीय खर्चात झालेली घट यामुळे करानंतरच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली.

ते असेही म्हणाले, आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीदरम्यान तानुकू येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्रातून उच्च क्षमतेच्या अ‍ॅनेस्थेटिक एपीआयचे व्यावसायिक बिलिंग आणि युरोपमधील ग्राहकाकडे शिपमेंट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. याशिवाय अँटीडायबेटिक, अँटिकोअग्युलंट (रक्त पातळ करणारे), खोकल्यावरचे औषध (अँटी टसिव्ह) आणि अँटीडिप्रेसंट या नवीन उत्पादनांच्या लाँचमुळे आगामी वर्षांत वाढीसाठी कंपनी भक्कम स्थितीत आहे. आर्थिक वर्ष २०२६ ची तिसरी तिमाही आणि नऊमाही या दोन्ही कालावधीत ईबीआयटीडीए सकारात्मक राहिला. नुकत्याच लाँच केलेल्या पोषणपूरक ‘सी-रेड’ आणि इतर उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच नवीन उपचार श्रेणींमध्ये विस्तारासाठी सक्षम उत्पादन श्रेणी तयार आहे.

Web Title: Wanburys profit surges pat jumps 1194 in q3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • Pharmaceutical Manufacturing Company

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे देशातील इंधन दरांबाबत सर्वात मोठे विधान
1

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे देशातील इंधन दरांबाबत सर्वात मोठे विधान

श्रीराम फायनान्सने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले! आता गुंतवणुकीवर मिळणार ७.५०% पर्यंत व्याज; जाणून घ्या नवे दर
2

श्रीराम फायनान्सने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले! आता गुंतवणुकीवर मिळणार ७.५०% पर्यंत व्याज; जाणून घ्या नवे दर

RBI Rules: बँक खात्याचे KYC अपडेट नसल्यास Freez होऊ शकतं अकाऊंट? काय आहे RBI चा नियम
3

RBI Rules: बँक खात्याचे KYC अपडेट नसल्यास Freez होऊ शकतं अकाऊंट? काय आहे RBI चा नियम

एबीबी इनोव्हेशन सेंटर मध्ये 37 देशांतील 1,000 हून अधिक नवोन्मेषक एकत्र आले; औद्योगिक एआय विकासाला मिळणार गती
4

एबीबी इनोव्हेशन सेंटर मध्ये 37 देशांतील 1,000 हून अधिक नवोन्मेषक एकत्र आले; औद्योगिक एआय विकासाला मिळणार गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.