Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिम्‍काने आर्थिक वर्षात २८०० कोटी रूपयांचा महसूल केला जमा, कोका-कोलाचा काय आहे प्लॅन ?

१९७१ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून लिम्‍का कंपनीच्‍या सर्वोत्तम पोर्टफोलिओला प्रबळ करण्‍यामध्‍ये प्रेरक शक्‍ती राहिला आहे, तसेच शहरी व ग्रामीण बाजारपेठांमध्‍ये मागणी वाढत आहे. आज, ब्रँड दिल्‍ली, पंजाब व हरियाणा यांसारख्‍या

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: May 28, 2025 | 06:58 PM
लिम्‍काने आर्थिक वर्षात २८०० कोटी रूपयांचा महसूल केला जमा, कोका-कोलाचा काय आहे प्लॅन? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

लिम्‍काने आर्थिक वर्षात २८०० कोटी रूपयांचा महसूल केला जमा, कोका-कोलाचा काय आहे प्लॅन? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

लिम्‍का या कोका-कोला इंडियाच्‍या आयकॉनिक स्‍वदेशी बेव्‍हरेजने आर्थिक वर्ष २४ मध्‍ये २८०० कोटी रूपये महसूलाचा टप्‍पा पार केला आहे, ज्‍यामुळे भारतभरात उत्तम गतीसह लेमन-लाइम श्रेणीच्‍या प्रगतीला चालना मिळाली आहे. पाच दशकांहून अधिक काळापासून लिम्‍का सिग्‍नेचर क्‍लाऊडी बबल्‍स आणि स्‍वादिष्‍ट लाइम ‘एन’ लेमनी चवीसह उन्‍हाळ्यातील रिफ्रेशमेंटचे अल्टिमेट बेव्‍हरेज राहिले आहे.

१९७१ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून लिम्‍का कंपनीच्‍या सर्वोत्तम पोर्टफोलिओला प्रबळ करण्‍यामध्‍ये प्रेरक शक्‍ती राहिला आहे, तसेच शहरी व ग्रामीण बाजारपेठांमध्‍ये मागणी वाढत आहे. आज, ब्रँड दिल्‍ली, पंजाब व हरियाणा यांसारख्‍या प्रमुख राज्‍यांमध्‍ये प्रबळ दोन-अंकी वाढ करत आहे. याव्‍यतिरिक्‍त, समकालीन ट्रेड आणि उदयोन्‍मुख रिटेल प्रकारांमध्‍ये हिस्‍सा संपादित करत आहे.

आता शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणार जास्त भाव, ‘या’ १४ पिकांची किमान आधारभूत किंमत वाढली

लिम्‍काच्‍या अविरत यशामागील प्रमुख बाब म्‍हणजे ब्रँडच्‍या नाविन्‍यपूर्ण मोहिमा, ज्‍या ब्रँडला समकालीन ठेवण्‍यासोबत ब्रँडच्‍या वारसाला साजरे करतात. २०२५ मध्‍ये, लिम्‍काने तृप्‍ती डिमरी सोबतच्या मोहिमेसह रिफ्रेशमेंटच्‍या नवीन युगामध्‍ये प्रवेश केला. लिम्‍काच्‍या सिग्‍नेचर लाइम ‘एन’ लेमनी रिफ्रेशमेंटवर नवीन टेकसह या मोहिमेने ग्राहकांना मोहकता आणि उत्‍साहित करणाऱ्या क्षणांचा पुन्‍हा शोध घेण्‍याचे आवाहन केले, जे फक्‍त लिम्‍काचा आस्‍वाद घेत मिळू शकते.

कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्‍ट एशियाच्‍या डेव्‍हलपिंग मार्केट्सच्‍या फ्रँचायझी ऑपरेशन्‍सचे उपाध्‍यक्ष विनय नायर म्‍हणाले, ”आमचे उत्‍पादनापलीकडे जाणारे, दैनंदिन जीवन व सहयोगात्‍मक आठवणीचा भाग बनणारे ब्रँड्स निर्माण करण्‍याचे नेहमी ध्‍येय राहिले आहे. लिम्‍काच्‍या गाथेमधून स्थिरता, नवीन शोध आणि सर्वोत्तमतेप्रती प्रयत्‍न दिसून येतात. आमचे यश साध्‍या, पण प्रबळ तत्त्वामध्‍ये सामावलेले आहे, ते म्‍हणजे ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करणाऱ्या उत्‍पादनांमध्‍ये नाविन्‍यता आणणे, भारतातील शहरी व ग्रामीण भागांमध्‍ये वितरण विस्‍तारित करणे आणि आवड व उद्देशाशी जुळणाऱ्या विपणन मोहिमा राबवणे. आम्‍हाला ही गती सुरू ठेवण्‍याचा आणि लाखो ग्राहकांना दीर्घकालीन मूल्‍य वितरित करण्‍याचा आनंद होत आहे.

भारतीयांच्या जीवनशैलीमध्‍ये बदल होत असताना लिम्‍कामध्‍ये देखील बदल होत आहे. २०२४ मध्‍ये, लिम्‍काने लिम्‍का ग्‍लुकोचार्ज लाँच करत प्रगत हायड्रेशन श्रेणीमध्‍ये प्रवेश केला. ग्‍लुकोज व इलेक्‍ट्रोलाइट्स असलेले हे खास बेव्‍हरेज आजच्‍या काळातील सक्रिय ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ऑलिम्पिक सुवर्ण पदकविजेता नीरज चोप्रा सामील असलेल्या या लाँच कॅम्पेनने लाखो ग्राहकांना चिकाटीच्‍या संदेशासह प्रेरित केले, जो अॅथलीट्स व दैनंदिन जीवनातील हिरोंशी संलग्‍न आहे.

सर्वोत्तमतेप्रती ही कटिबद्धता फक्‍त क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नाही. यामधून लिम्‍काचे मूळ तत्त्व दिसून होते. ब्रँडचा नेहमी भारतीयांचे असाधारण यश सन्‍मानित व साजरे करण्‍यावर विश्‍वास आहे. हा विश्‍वास ब्रँडच्‍या तत्त्वाचे विस्‍तारीकरण म्‍हणून १९९० मध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्‍या लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्समधून दिसून येतो. क्रीडामधील असमान्य उपलब्‍धी असो किंवा कलात्‍मक यश असो हे बुक देशातील नागरिकांना मोठे स्‍वप्‍न पाहण्‍यास प्रेरित करत आहे.

लिम्‍का नाविन्‍यता आणण्‍यासोबत भावी पिढ्यांशी कनेक्‍ट होत असताना भारतातील सर्वात लोकप्रिय लेमन-लाइम बेव्‍हरेज म्‍हणून ब्रँडचा वारसा कायम दृढ होत आहे, विकासाला गती देत आहे आणि देशभरातील लाखो व्‍यक्‍तींना उत्‍साहित करत आहे.

Share Market Closing Bell: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, MFGC आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण

Web Title: Limca collected a revenue of rs 2800 crore in the financial year what is coca colas plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 06:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.