Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभरात दारू स्वस्त होणार; वाचा… केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काय केलीये महत्वाची तरतूद!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी बजेट सादर केले. विशेष अर्थसंकल्पातील एका तरतुदीमुळे मद्यपींना मोठा दिलासा मिळणार आहे. देशभरात दारुच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया... नेमकी अशी काय घोषणा केलीये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी की ज्यामुळे आता दारूच्या किमती कमी होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 24, 2024 | 09:59 PM
देशभरात दारू होणार स्वस्त; वाचा... केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काय केलीये महत्वाची तरतूद!

देशभरात दारू होणार स्वस्त; वाचा... केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काय केलीये महत्वाची तरतूद!

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 साठी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी आयकराच्या नवीन कर प्रणालीत काही बदल करण्याची घोषणा केली आहे. तर मानक वजावटीची, स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच आता देशभरातील मद्यपींच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या दारूच्या दरात कपात होईल, यासाठी देखील सरकारकडून महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे देशभरात दारुच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे.

काय आहे ही घोषणा?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेत (ता.23) आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात त्यांनी प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, यामध्ये प्रामुख्याने सीमा शुल्क, जीएसटीसह इतर करांचा समावेश आहे. या सर्व करांमध्ये बदल होणार असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्पात एक महत्वाची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा : हमीभाव कायद्यासाठी सरकारला घेरणार; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा शेतकरी नेत्यांना शब्द!

काय आहे ही तरतूद?

केंद्र सरकारने कलम-9 मध्ये सुधारणा करत ईएनए हे केंद्रीय जीएसटीच्या परीघा बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. ईएनए म्हणजे एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोलचा वापर अल्कोहोल बेव्हरेजेस तयार करण्यासाठी करण्यात येतो. अर्थात सरकारच्या या निर्णयामुळे दारु स्वस्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय केंद्र सरकारने सीजीएसटीसह इंट्रिग्रेटेड जीएसटी आणि टेरिटेरी जीएसटीमध्ये बदल करणार असल्याचे म्हटले आहे.

परिणामी, सरकारच्या या निर्णयांमुळे देशातंर्गत व्यापार आणि परदेशातून होणारी मद्य आयात यावरील खर्चात कपात होईल. ज्यामुळे दारू स्वस्त होण्यास मदत होणार आहे. आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत याविषयीचे चित्र स्पष्ट होईल. या कपातीचा किती फायदा होईल? याची माहिती पण या बैठकीत समोर येणार आहे.

Web Title: Liquor will be cheaper in the country government important provision in the budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 09:50 PM

Topics:  

  • Finance Minister
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका
1

Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा
2

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.