
Maharashtra Petrol Diesel Price Today: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Maharashtra Petrol Diesel Price Today: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबत कोणताही करार करणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर, कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.ट्रम्पने एक वाक्य बोलले आणि जगातल्या तेलाच्या बाजारात लगेच हलचल झाली. त्यांनी सांगितलं, इराणसोबत आम्ही कोणताही करार करणार नाही. झालं. त्यानंतर कच्च्या तेलाचे भाव परत वर जायला लागले. पश्चिम आशियात चाललेलं युद्ध संपेल, तेलाचा पुरवठा सुरळीत होईल, अशी जी आशा होती, ती आता मावळलीय.
हा सगळ्यांसाठी मोठा झटका आहे.पण याच वेळी भारतात मात्र वेगळं चित्र आहे. भारतातील तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशभरात दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे महाराष्ट्रात पण भाव कालचेच आहेत. फक्त एकच जिल्हा सोडला तर.चला, मग बघूया महाराष्ट्रात आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल काय भावाने मिळतंय.
अहमदनगर – पेट्रोल 112.41 रुपये , डिझेल 99.06 रुपये
अकोला – पेट्रोल 111.78 रुपये , डिझेल 98.48 रुपये
अमरावती – पेट्रोल 111.97 रुपये , डिझेल 98.64 रुपये
औरंगाबाद – पेट्रोल 112.08 रुपये , डिझेल 98.72 रुपये
भंडारा – पेट्रोल 112.81 रुपये , डिझेल 99.47 रुपये
बीड – पेट्रोल 112.45 रुपये , डिझेल 99.11 रुपये
बुलढाणा – पेट्रोल 112.63 रुपये , डिझेल 99.28 रुपये
चंद्रपूर – पेट्रोल 112.58 रुपये , डिझेल 99.26 रुपये
धुळे – पेट्रोल 112.19 रुपये, डिझेल 98.84 रुपये
गडचिरोली – पेट्रोल 112.95 रुपये, डिझेल 99.61 रुपये
गोंदिया – पेट्रोल 113.04 रुपये , डिझेल 99.66 रुपये
ग्रेटर मुंबई / मुंबई – पेट्रोल 111.21 रुपये , डिझेल 97.83 रुपये
हिंगोली – पेट्रोल 113.17 रुपये , डिझेल 99.83 रुपये
जळगाव – पेट्रोल 112.57 रुपये , डिझेल 99.20 रुपये
जालना – पेट्रोल 113.21 रुपये , डिझेल 99.87 रुपये
कोल्हापूर – पेट्रोल 112.60 रुपये , डिझेल 99.25 रुपये
लातूर – पेट्रोल 112.61 रुपये , डिझेल 99.21 रुपये
नागपूर – पेट्रोल 111.72 रुपये , डिझेल 98.38 रुपये
नांदेड – पेट्रोल 113.18 रुपये , डिझेल 99.83 रुपये
नंदुरबार – पेट्रोल 112.48 रुपये , डिझेल 99.13 रुपये
नाशिक – पेट्रोल 112.24 रुपये , डिझेल 98.89 रुपये
धाराशिव – पेट्रोल 112.45 रुपये , डिझेल 99.11 रुपये
पालघर – पेट्रोल 112.04 (+0.34) रुपये , डिझेल ₹98.66 (+0.32) रुपये
परभणी – पेट्रोल 113.16 रुपये , डिझेल 99.83 रुपये
पुणे – पेट्रोल 111.90 रुपये , डिझेल 98.55 रुपये
रायगड – पेट्रोल 111.46 रुपये , डिझेल 98 .11 रुपये
रत्नागिरी – पेट्रोल 113.17 रुपये , डिझेल 99.83 रुपये
सांगली – पेट्रोल 112.44 रुपये , डिझेल ₹99.11 रुपये
सातारा – पेट्रोल 111.88 रुपये , डिझेल 98.53 रुपये
सिंधुदुर्ग – पेट्रोल 113.17 रुपये , डिझेल 99.83 रुपये
सोलापूर – पेट्रोल 111.85 रुपये, डिझेल 98.52 रुपये
ठाणे – पेट्रोल 111.31 रुपये , डिझेल 97.97 रुपये
वर्धा – पेट्रोल 112.38 रुपये , डिझेल 99.05 रुपये
वाशिम – पेट्रोल 112.63रुपये , डिझेल 99.28 रुपये
यवतमाळ – पेट्रोल 113.17 रुपये , डिझेल 99.83 रुपये
तथापि, जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर लक्षणीयरीत्या कमी आहेत.आता तुम्ही म्हणाल, आपल्याकडे पेट्रोल 111-113 रुपये आहे, ते महागच आहे. पण जगाशी तुलना केली तर आपण अजूनही स्वस्तात आहोत. जगात पेट्रोलची सरासरी किंमत प्रति लिटर 145.86 रुपये आहे. तर भारतात ती 108.65 रुपये आहे.
Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला ‘हे’ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला
जगापेक्षा आपल्याकडे जवळपास 37 रुपये कमी आहे.डिझेलचं पण तसंच आहे. जगात डिझेलची सरासरी किंमत 155.87 रुपये लिटर आहे. तर भारतात ती फक्त 98.10 रुपये आहे. म्हणजे जवळपास 57 रुपये कमी. म्हणूनच सध्या तरी घाबरायची गरज नाही. ट्रम्पच्या वक्तव्यामुळे कच्चं तेल महागलं असलं तरी भारतात अजून दर वाढलेले नाहीत. पुढे काय होईल, ते तेल कंपन्यांच्या उद्याच्या सकाळच्या 6 वाजताच्या अपडेटवरूनच कळेल. तोपर्यंत गाडीची टाकी फुल करायची असेल तर आजच करून घ्या, काय सांगावं उद्या भाव वाढले तर.