'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; 'ही' प्रक्रिया पुर्ण कराच!
केंद्र सरकारने नववर्ष सुरु होण्यापूर्वी 5 राज्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांंनी सरकारच्या या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितले आहे की, मोदी सरकारने नेहमीच शेतकऱ्यांसाठी समर्पित भावनेने काम केले आहे. त्याच भावनेतून केंद्र सरकारकडून आज ५ राज्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोपरा अर्थात नारळाचे खोबरे यासाठी किंमत धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे.
अश्विनी वैष्णव म्हणाले आहे की, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खोबऱ्याच्या दरात प्रति क्विंटलमागे ४२२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता सुखे खोबरे 11582 रुपयांना खरेदी केले जाणार आहे. तर बॉल कोपराच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिक्विंटलमागे 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता बॉल खोबरे हे 12100 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आहे, कर्नाटकात कोपराचे सर्वाधिक उत्पादन होते. एकूण उत्पादनात कर्नाटकचा वाटा ३२.७ टक्के इतका आहे. उत्पादनात तामिळनाडूचा 25.7 टक्के, केरळचा 25.4 टक्के आणि आंध्र प्रदेशचा 7.7 टक्के वाटा आहे. त्यासाठी सरकारने 855 कोटी रुपयांचे बजेट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आहे की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यातून सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी, शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची वचनबद्धता दिसून येते. आपल्या देशात कोपरा उत्पादनात कर्नाटकचा वाटा सर्वाधिक आहे. नाफेड आणि NCCF या दोन्ही कोपरा खरेदीसाठी केंद्रीय नोडल एजन्सी असतील आणि त्याशिवाय राज्य सरकारांचा यात मोठा सहभाग असेल, त्यामुळे ही खरेदी राज्य सरकारच्या महामंडळांच्या सहकार्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
सद्यःस्थितीत जगभरातील 92 देशांत नारळाचे उत्पादन होते. आशिया खंडातील इंडोनेशिया, फिलिपिन्स, भारत आणि श्रीलंका हे देश उत्पादकतेत आघाडीवर आहेत. नारळ उत्पादनात भारत दुसर्या क्रमांकावर, तर देशात महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात नारळाखाली क्षेत्र 33 हजार 426 एकर इतके तर नारळ उत्पादन 175.10 दशलक्ष नारळ इतके आहे.
भारतातील प्रतिहेक्टरी सरासरी उत्पन्न 7747 क्विंटल इतके तर महाराष्ट्रात प्रतिहेक्टरी उत्पादन हे 8383 क्विंटल इतके होते. भारतात सध्या उंच वाढणार्या जातीपासून लागवडीनंतर सहाव्या वर्षांपासून 82 वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. ठेंगणे वाण 40 ते 50 वर्षांचे राहते व याला चौथ्या वर्षांपासून फळे मिळतात. उंच वाढणार्या वाणापासून शहाळे, खोबरे, तेल, तसेच चिप्स व इतर उपपदार्थ मिळतात. करवंटी पावडरलाही जागतिक स्तरावर मागणी आहे.