दुकानाचे महिन्याचे भाडे 40 लाख रुपये; मुंबईतील 'हा' मॉल आहे सर्वाधिक महागडा!
देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई नावारुपाला आली आहे. मुंबईमध्ये शोरुम किंवा गाळा घेऊन व्यवसाय करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, शोरुमसाठीच्या खर्चामुळे अनेकांना ते शक्य होत नाही. मात्र, त्यातही काही जण हे अधिकचे भांडवल गुंतवून आपला व्यवसाय थाटत असतात. मात्र, आता मुंबईमध्ये एक असे देखील शोरुम आहे, ज्यातील दुकानाची किंमत किंवा गाळ्याची किंमत ऐकून तुम्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाही.
देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुंबई येथे जिओ वर्ल्ड प्लाझा नावाचा मॉल आहे. या मॉलचे काही शोरुम हे असे आहेत, ज्यांचे मासिक भाडे हे तब्बल ४० लाख रुपये इतके आहे. याशिवाय त्यांना त्यातून मिळणारे उत्पन्नांमध्ये देखील जिओ वर्ल्ड प्लाझाचा हिस्सा असतो.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
शोरूमचे मासिक भाडे 40 लाख रुपये
मुकेश अंबानी कुटुंबाचा हा जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. मीडीया रिपोर्टसनुसार, मुंबईतील या लक्झरी ब्रँडच्या रिटेल स्टोअरचे भाडे येथे गगनाला भिडले आहे. या ठिकाणी अनेक शोरूम आहेत, ज्यांचे मासिक भाडे 40 लाख रुपये इतके आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार 92 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी भारतात समृद्धीच्या शिखरावर आहेत. अशा व्यक्तीचे भाडेकरू बनण्यासाठी कंपन्या सर्व रेकॉर्ड मोडत आहेत.
वर्षाच्या अखेरीस अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, वाचा… 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?
जिओ वर्ल्ड सेंटरच्या दीर्घकालीन योजनेअंतर्गत, मुकेश अंबानी यांनी 2023 मध्ये देश आणि जगातील श्रीमंतांसाठी एक गंतव्यस्थान म्हणून जिओ वर्ल्ड प्लाझाची कल्पना मांडली. देशातील महागडे फॅशन ब्रँड खरेदी करण्यासाठी हे सर्वात मोठे डेस्टिनेशन आहे.
हे लोक देतात सर्वात महाग भाडे
फ्रेंच फॅशन दिग्गज लुई व्हिटन, त्याच्या आयकॉनिक हँडबॅग्ज, सामान आणि ॲक्सेसरीजसाठी ओळखले जाते. त्यांचे देखील येथे शोरूम आहे. ते ७,४६५ स्क्वेअर फुटांच्या या शोरूमसाठी कंपनी ४० लाख ५० हजार रुपये मासिक भाडे देते. लक्झरी फॅशन हाऊस डायर 3,317 स्क्वेअर फूटच्या दोन युनिट्ससाठी 21 लाख 56 हजार रुपये मासिक भाडे देते. जगातील प्रसिद्ध लक्झरी ब्रँड Balenciaga ने जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये आपले पहिले स्टोअर उघडले आहे. त्याचे मासिक भाडेही 40 लाख रुपये आहे.
जिओ वर्ल्ड प्लाझा हा मुकेश अंबानीयांच्या मालकीचा भारतातील सर्वात विस्तृत लक्झरी मॉल आहे. मुंबईतील प्रतिष्ठित वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये वसलेल्या या मॉलने 1 नोव्हेंबर 2023 रोजी लोकांसाठी आपले दरवाजे उघडले. ज्याद्वारे याआधी कधीही कधीही नसलेला खरेदीचा अनुभव मिळत आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)