Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल डेटाप्रमाणे Jio देणार सर्वांसाठी स्वस्त AI सेवा, मुकेश अंबानींनी सांगितला प्लॅन…

जिओ आता इंटरनेट युगानंतर भारताला इंटेलिजेंस युगात जोडण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. AI सेवा मोबाईल डेटा प्रमाणे परवडणारी, भारतीय भाषांमध्ये आणि विविध क्षेत्रांसाठी उपलब्ध होणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 19, 2026 | 03:16 PM
mukesh ambani jio ai

mukesh ambani jio ai

Follow Us
Follow Us:
  • Jio भारतीयांसाठी देणार सर्वात स्वस्त AI सेवा
  • जिओ AI करणार भारतीय भाषांमध्ये काम
  • AI रेडी टेडा सेंटर पार्क नेमकं काय? 
AI Summit Mukesh Ambani: भारताचे अब्जाधीश उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनीही AI इम्पॅक्ट समिटमध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्याप्रमाणे कमी किमतीत डेटा उपलब्ध करुन दिला गेला त्याच प्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस AIला सामान्य भारतीय नागरिकांना उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. JIO भारताला इंटरनेट युगानंतर इंटेलिजेंस युगाशी जोडणार असल्याचं अंबानींनी स्पष्ट केलं.

प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

जिओ भारतीय भाषांमध्ये देणार AI सेवा

जिओ AI बाबत बोलताना मुकेश अंबानींनी सांगितलं की, “जिओ AI भारतीय भाषांमध्ये काम करणार आहे. ज्यामुळे शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि लहान व्यवसायिक त्यांच्या स्वतःच्या भाषेत एआय वापरतील. कंपनीने यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. शिक्षणासाठी जिओ शिक्षा एआय, आरोग्यासाठी जिओ आरोग्य एआय, शेतीसाठी जिओ कृषी आणि सामान्य वापरासाठी जिओ भारत आयक्यू असे प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. ज्यामुळे स्थानिक भाषांमध्ये एआय काम करेल आणि उपाय सुचवेल.

AI रेडी टेडा सेंटर पार्क नेमकं काय?

मुकेश अंबानींनी AI रेडी टेडा सेंटर पार्कबाबत सांगितलं की, कंपनी जामनगरमध्ये टप्प्याटप्प्याने मल्टी-गीगावॅट AI-रेडी डेटा सेंटर पार्क विकसित करत आहे. २०२६ च्या शेवटी १२० मेगावॅट क्षमतेसह ते सुरू करणार असल्याचं उद्दिष्ट आहे. आणि त्यानंतर हा क्षमता एक गिगावॅटपर्यंत वाढवली जाणार आहे. ही संपूर्ण पायाभूत सुविधा ग्रीन एनर्जीवर आधारित असेल. याशिवाय जिओ तिच्या नेटवर्कद्वारे देशव्यापी संगणकीय क्षमता प्रदान करेल, ज्यामुळे व्यक्ती, दुकाने, शाळा, रुग्णालये आणि शेतांना कमी खर्चात आणि उच्च गतीने AI सेवा पुरवली जाऊ शकेल.

भारत बनू शकतो 21 व्या शतकातील AI पॉवर

मुकेश अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला की, जर तंत्रज्ञान सुलभ, परवडणारं आणि देशाच्या गरजांनुसार विकसित केलं गेलं तर भारत २१ व्या शतकात एक आघाडीची AI पॉवर बनू शकते. जिओने केलेल्या या घोषणांवरून कंपनी कनेक्टिव्हिटीनंतर आता एआयला पुढील राष्ट्रीय पायाभूत सुविधा बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे. AIशी संबंधित समस्यांबाबत बोलताना अंबानी म्हणाले, “एआय हा मंत्र आहे जो प्रत्येक उपकरणाला जलद, चांगले आणि स्मार्ट काम करण्यास सक्षम बनवतो. मला AIला एका आधुनिक रुपात पाहायचं आहे, जे निरंतर सेवा देऊ शकतं. AI नोकऱ्या हिरावून घेणार नाही, उलट उच्च-कुशल कामात नवीन संधी निर्माण करणार आहे.”

iPhone 17 Pro Max खरेदीची संधी! Amazon वर ₹10,000 पर्यंतची मोठी सूट

Web Title: Jio will give low cost ai to indians mukesh ambani india ai impact summit 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • ai
  • Artificial intelligence
  • jio
  • Mukesh Ambani

संबंधित बातम्या

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
1

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा
2

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई
3

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार
4

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.