ना मुकेश अंबानी, ना गौतम अदानी; अझीम प्रेमजी देखील नाही; हे आहे भारतातील सर्वाधिक दानशूर उद्योगपती!
भारतात अब्जाधीशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे उद्योगधंद्यांच्या माध्यमातून होणारा नफा अधिक असल्याने उद्योगपती हे मुक्तहस्ते दानधर्मही करत असतात. मात्र, आता भारतात अब्जाधीशांची संख्या अधिक असतानाच, तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, देशातील सर्व अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक दानधर्म करणारा अब्जाधीश कोण असेल? याच पार्श्वभुमीवर आज आपण तुमच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत…
सर्वात श्रीमंत उद्योगपतींची यादी
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत मुकेश अंबानी, गौतम अदानी हे सर्वाधिक वरती असलेले नाव आहे. मात्र, फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट असलेले गौतम अदानी किंवा मुकेश अंबानी यांना देखील आजपर्यंत सर्वाधिक दानधर्म करणारा अब्जाधीश ही पदवी मिळालेली नाही. विशेष म्हणजे उद्योगविश्वातील मोठे नाव असलेले अजीम प्रेमजी यांना देखील परोपरकार करण्यात पहिले स्थान मिळवता आलेले नाही. इतकेच नाही हे स्थान अलिकडेच निधन झालेले दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्याकडे देखील नाही.
हे देखील वाचा – ॲपल कंपनीला या एआय कंपनीने टाकले मागे, बनलीये जगातील सर्वात मोठी कंपनी!
कोण आहे देशातील सर्वाधिक दानधर्म करणारा उद्योगपती
शिव नादर हे सध्या देशातील सर्वात मोठे परोपकारी किंवा देणगीदार उद्योगपती आहेत. सर्वाधिक दानधर्म करण्याचा खिताब प्राप्त करून, ते हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर आले आहेत. ही यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शिव नादर आणि कुटुंबाने २१५३ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. यानंतर मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव आहे. अंबानी कुटूंबाने 407 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
हे देखील वाचा – बीएसएनएलकडून मिळाली मोठी ऑर्डर, या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडलेत!
हे आहेत देशातील ५ सर्वाधिक दानधर्म करणारे उद्योगपती
हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट 2024 मध्ये शिव नादर आणि कुटुंब 2153 कोटी रुपयांच्या देणगीसह पहिल्या क्रमांकावर, मुकेश अंबानी आणि कुटुंब 407 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर, बजाज कुटुंब 352 कोटी रुपयांच्या देणगीसह तिसऱ्या क्रमांकावर, कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब ३३४ कोटी देणगीसह चौथ्या क्रमांकावर तर गौतम अदानी आणि त्यांचे कुटूंब हे ३३० कोटी देणगीसह पाचव्या स्थानावर आहेत.
हे देखील वाचा – पैसे तयार ठेवा, …येतोय देशातील सर्वात मोठा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार!
१० उद्योगपतींनी दिलेली एकूण दानाची रक्कम
2024 या आर्थिक वर्षात देशातील शीर्ष 10 दानशूर व्यक्तींनी एकत्रितपणे 4625 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या आधारे देशातील उद्योगपतींनी दिलेल्या एकूण रकमेपैकी ५३ टक्के रक्कम टॉप १० व्यावसायिकांनी दिली आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा (सीएसआर) एक भाग म्हणून दान केलेली सर्वोच्च रक्कम मुख्यत्वे शिक्षण, दर्जेदार शिक्षण आणि शैक्षणिक प्रकल्पांसाठी आहे.