Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Noel Tata Vs N Chandrasekaran Tata Group : देशातील कॉर्पोरेट क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत असून, नोएल टाटा यांनी एन. चंद्रशेखरन यांच्या विरोधात बॉम्बे उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान देण्याची तयारी केल्याची माहिती आहे.
Photo - Social Media
बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारीNoel Tata Vs N Chandrasekaran Tata Group :
Published on: 
Updated on: 
  • Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात!

  • बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी

  • काय निर्णय होणार?

Noel Tata Vs N Chandrasekaran Tata Group : टाटा समूहातील संघर्ष आता कोणापासून लपून राहिलेला नाही. यात आता एक मोठं वळण आलं आहे. नोएल टाटा आणि एन. चंद्रशेअरन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी स्पष्ट केलं की, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा हे, एन. चंद्रशेखरन यांच्या टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी झालेल्या पुनर्नियुक्तीला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, असेही वृत्त आहे की, टाटा सन्स स्वतःला सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी आपल्या आयपीओपूर्वी कंपनीच्या नियमावलीत सुधारणा देखील करण्याची योजना आखली जात आहे. याव्यतिरिक्त, कंपनी सभेत न. चंद्रशेखरन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी या दोन्ही निर्णयांना आव्हान दिले आहे.

बऱ्याच महिन्यांपासून तणाव

चंद्रशेखरन यांना नव्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ज्या प्रक्रियेने पुनर्नियुक्त करण्यात आले, त्या प्रक्रियेवरून नोएल टाटा आणि टाटा सन्सच्या इतर संचालक मंडळाच्या सदस्यांमध्ये महिन्याभरापासून असलेल्या मतभेदांचा हा कायदेशीर लढा परिणाम आहे. नोएल टाटा यांचा विरोध असूनही, संचालक मंडळाने १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली.

नोएल टाटांकडून मागण्यांचा पुनरुच्चार

३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी, नोएल टाटा यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे की, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे अजेंड्यावरील इतर बाबींच्या आधी मांडले जावेत. टाटा सन्सचे कंपनी सचिव, सुप्रकाश मुखोपाध्याय यांना लिहिलेल्या एका नव्या चार पानी पत्रात, नोएल यांनी चर्चेच्या क्रमाव्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे अधोरेखित केले आहेत आणि आपल्या काही पूर्वीच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे.

कंपनीच्या नियमावलीतील कलम 121B चा हवाला देत, नोएलने असा युक्तिवाद केला की संचालकांनी जारी केलेल्या सूचनांचा विचार इतर प्रस्तावांपूर्वी केला पाहिजे. त्यांनी २६ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या आपल्या संदेशाचाही संदर्भ दिला, ज्यामध्ये त्यांनी अनेक चिंता व्यक्त केल्या होत्या.