NSE Global Ranking : सांगता काय? भारतीय शेअर बाजाराचा जागतिक डंका! NSE बनले जगातील तिसरे सर्वात मोठे एक्सचेंज

NSE Global Ranking : भारतीय भांडवली बाजाराने जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली असून, नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE ने लंडन स्टॉक एक्सचेंजला मागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एक्सचेंज बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
Photo - Social Media
NSE Global Ranking NSE Global Ranking
Published on: 
Updated on: 
  • सांगता काय?

  • भारतीय शेअर बाजाराचा जागतिक डंका!

  • NSE बनले जगातील तिसरे सर्वात मोठे एक्सचेंज

NSE Global Ranking : भारतीय शेअर बाजाराबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. जागतिक स्तरावर आपलं स्थान निर्माण करत NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजने बाजार भांडवलाच्या बाबतीत लंडन स्टॉक एक्सचेंजला माग टाकलं आहे. यामुळे NSE जगातील तिसरे सर्वात मोठे शेअर एक्सचेंज बनले आहे. ही कामगिरी भारतीय शेअर बाजाराची वाढती ताकद आणि जागतिक ओळख दर्शवण्यासाठी महत्त्वपू्र्ण ठरत आहे.

लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुपच्या आकडेवारीनुसार, NSE चे बाजार भांडवल अंदाजे ₹५.८६ लाख कोटींवर पोहोचले आहे, तर लंडन स्टॉक एक्सचेंजचे (LSE) मूल्य अंदाजे ₹५.७७ लाख कोटी आहे. याचा अर्थ, NSE ने या बाबतीत लंडनला मागे टाकले आहे.

जगातील अव्वल एक्सचेंजेसमध्ये NSE चे स्थान

NSE ने जर्मन कंपनी डॉइच बोर्स एजीला मागे टाकले आहे, जिचे बाजार भांडवल अंदाजे ₹५.९ लाख कोटी म्हणजेच US$६३.४ अब्ज इतकं आहे. सध्या, बाजार भांडवलामध्ये केवळ दोन प्रमुख एक्सचेंजेस NSE पेक्षा पुढे आहेत. यापैकी, CME ग्रुप अंदाजे ₹१०.४९ लाख कोटींच्या बाजार भांडवलासह पहिल्या क्रमांकावर आहे आणि इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज अंदाजे ₹९.३४ लाख कोटींच्या मूल्यांकनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

NSE च्या शेअर्समध्येही तेजी

यशासोबतच NSE च्या शेअर्समध्येही सातत्यपूर्ण वाढ दिसून आली आहे. गुरुवारी दुसऱ्या ट्रेडिंग सत्रातही स्टॉकची वाढ कायम राहिली. आतापर्यंत, नोव्हेंबरमधील १८ पैकी १४ ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉकने नफा नोंदवला आहे. या तेजीमुळे स्टॉकने ₹२,४०० चा नवा उच्चांक गाठला.

यापूर्वी ऑक्टोबरमध्येही स्टॉकने अंदाजे ३४% ची वाढ नोंदवली होती. शेअर बाजारातील सातत्यपूर्ण आणि जोरदार हालचालींनी एनएसईचे बाजारमूल्य वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत लंडनला मागे टाकणे हे भारतीय वित्तीय बाजाराला मिळत असलेल्या वाढत्या जागतिक मान्यतेचं एक उत्तम उदाहरण आहे. पण, एक्सचेंजेसच्या बाजार भांडवलातील बदलांनुसार त्यांच्या क्रमवारीत बदल नक्कीच होऊ शकतो.