Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ola फक्त कंपनी नव्हे तर दोन तरुणांची अद्भुत कल्पना! देशभरात ही कॅब सेवा कशी सुरु झाली?

भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी सुरू केलेल्या ओला कंपनीने भारतीय प्रवास क्षेत्रात क्रांती घडवली. दोन कॅब्सपासून सुरू झालेल्या या प्रवासाने आज ओला इलेक्ट्रिकसह आंतरराष्ट्रीय बाजारातही आपली छाप सोडली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2025 | 07:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

साल 2010 मध्ये दोन तरुण भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी एक वेगळीच कल्पना मांडली. एकदा भाविश कर्नाटकमधून मुंबईला जात असताना त्याला टॅक्सी ड्रायव्हरने अर्ध्या रस्त्यात सोडलं. त्यावेळी त्याच्या मनात विचार आला “आपण अशी एखादी सेवा सुरू का करू नये, जिथे लोक मोबाइलवरून सहजपणे टॅक्सी बुक करू शकतील?” याच कल्पनेतून ओला (Ola) या कॅब स्टार्टअपची सुरुवात झाली.

रेल्वे शेअर्समध्ये तेजी, आरव्हीएनएल, आयआरएफसी, बीईएमएलचे शेअर्स ११ टक्क्यापर्यंत वाढले; कारण काय?

सुरुवातीला कंपनीचं नाव OlaCabs होतं आणि त्यांच्याकडे फक्त दोनच गाड्या होत्या. त्यांनी एक अ‍ॅप तयार केलं ज्यामध्ये ग्राहकांना घरबसल्या टॅक्सी बुक करता येईल. त्या काळात अशा प्रकारचं तंत्रज्ञान भारतात नवीन होतं. त्यामुळे लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. ओलाने त्यासाठी मोफत राईड्स, कॅश पेमेंट आणि वेळेवर सेवा देऊन ग्राहकांचं मन जिंकलं.

ड्रायव्हर पार्टनर्ससाठी ओलाने चांगली कमाई, लवचिक वेळ आणि प्रशिक्षणाची सोय केली. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आपली गाडी ओलाशी जोडली. यामुळे कंपनीचं नेटवर्क वाढत गेलं. लवकरच मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये ओलाने पाय रोवले. ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार ओलाने ओला मिनी, ओला शेअर, ओला आउटस्टेशन अशा विविध सेवा सुरू केल्या. नंतर ओलाने ऑटो रिक्षा आणि ई-रिक्शाही अ‍ॅपमध्ये समाविष्ट केल्या. या सेवांमुळे ग्रामीण भागातही ओला पोहोचू लागली.

ट्रम्प व्यापार युद्धाचा देशाला मोठा फायदा! भारताला जगभरातील गुंतवणूकदारांची पहिली पसंती

कंपनीने भारताबाहेर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूकेमध्येही सेवा सुरू केली. पुढे ओला इलेक्ट्रिकची स्थापना करून त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने पाऊल टाकलं. ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटरने बाजारात चांगली छाप पाडली. आज ओला ही केवळ कॅब सेवा नाही, तर एक संपूर्ण मोबिलिटी सोल्यूशन बनली आहे. सुरुवातीला अपयश, टीका आणि स्पर्धा यांना तोंड देत ओलाने एक यशस्वी भारतीय स्टार्टअप म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भाविश आणि अंकितच्या कल्पनेतून जन्मलेली ही कंपनी आज लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा भाग बनली आहे: हीच खरी यशोगाथा!

Web Title: Ola cabs ya success marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 07:56 PM

Topics:  

  • chanakyaniti for success
  • OLA Electric Share

संबंधित बातम्या

अरे ही खरंच बाईक आहे का? Ola कडून इलेक्ट्रिक बाईक Diamondhead चा टिझर प्रदर्शित
1

अरे ही खरंच बाईक आहे का? Ola कडून इलेक्ट्रिक बाईक Diamondhead चा टिझर प्रदर्शित

‘बिजप्रॉस्पेक्ट्स’चा यशस्वी प्रवास; मुर्तजा अमीन यांची संघर्षमय कहाणी
2

‘बिजप्रॉस्पेक्ट्स’चा यशस्वी प्रवास; मुर्तजा अमीन यांची संघर्षमय कहाणी

मायलेकीने सोबत क्रॅक केली NEET परीक्षा… वयाच्या पन्नाशीत जॉईन करणार मेडिकल कॉलेज
3

मायलेकीने सोबत क्रॅक केली NEET परीक्षा… वयाच्या पन्नाशीत जॉईन करणार मेडिकल कॉलेज

ओला इलेक्ट्रिकचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर; निव्वळ तोटा झाला दुप्पट, गुंतवणूकदार चिंतेत
4

ओला इलेक्ट्रिकचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर; निव्वळ तोटा झाला दुप्पट, गुंतवणूकदार चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.