व्वा रे पठ्ठ्या..! थेट ओला इलेक्ट्रिक कंपनीशी भिडला; एकाच महिन्यात कंपनीचा शेअर रेकॉर्डब्रेक आपटला!
सध्याचा घडीला अनेकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे वाढत आहे. त्यातही ओलाची इलेक्ट्रिक स्कुटर म्हटले की, सर्वांना खरेदी करावीशी वाटणारी स्कुटर म्हणून ती ओळखली जाते. मात्र, असे असले अनेक जण या इलेक्ट्रिक स्कुटरच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. असाच काहीसा प्रकार आज समाजमाध्यम एक्सवर पाहायला मिळाला आहे. ज्यात ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल आणि ‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरा यांच्यात शाब्दिक युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
इलेक्ट्रिक स्कुटरच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
ओलाची इलेक्ट्रिक स्कुटरच्या विक्रीनंतर तिच्या सेवेच्या दर्जाबाबत आज ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली. या चर्चेत ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ओला गिगा फॅक्टरीचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर ‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरा याने ओलाच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो पोस्ट केला. ज्या दुरुस्तीसाठी एकत्र उभ्या असलेल्या दिसून येत आहे. तसेच यावेळी त्याने इलेक्ट्रिक स्कुटरच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.
कामरा याने नितीन गडकरींना केले टॅग
दुचाकी ही अनेक रोजंदारी, कष्टकरी मजुरांची जीवनरेखा असल्याचे सांगून कामरा यांनी आपला मुद्दा परखडपणे मांडला आहे. त्यांनी नितीन गडकरींना एक्स या समाजमाध्यमावर टॅग करत प्रश्न विचारला आहे की, ‘भारतीय नागरिक अशा प्रकारे इलेक्ट्रिक व्हेईकल ईव्ही वापरतील का? या प्रश्नाने सरकारच्या ईव्ही धोरणावरही कुणाल कामरा यांनी निशाणा साधला आहे. कामरा म्हणाले आहे की ज्यांना ओला इलेक्ट्रिकशी काही समस्या आहे त्यांनी खाली प्रत्येकाला टॅग करून समस्या सांगावी, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Do indian consumers have a voice?
Do they deserve this?
Two wheelers are many daily wage workers lifeline…@nitin_gadkari is this how Indians will get to using EV’s? @jagograhakjago any word?
Anyone who has an issue with OLA electric leave your story below tagging all… https://t.co/G2zdIs15wh pic.twitter.com/EhJmAzhCmt— Kunal Kamra (@kunalkamra88) October 6, 2024
यावर भाविश अग्रवाल यांनी काय म्हटलंय
‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरा यांच्या या पोस्टवर उत्तर देताना भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे की, ‘तुम्ही खूप काळजी घेत आहात. या आणि आम्हांला मदत करा. मी तुम्हाला तुमच्या अयशस्वी कारकिर्दीसह या ‘पेड ट्विट’ पेक्षा अधिक पैसे देईन. आम्हांला खऱ्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करुद्यात. पुढे ते असेही म्हणाले आहे की, ‘ओला इलेक्ट्रिक आपल्या सेवा नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहे. लवकर चार्जिंगसाठीच्या लांबलचक रांगांची समस्या दूर केली जाईल. यानंतरही दोघांमध्ये एक्स या समाजमाध्यमावर जोरदार वाद सुरूच होता.