केक विकून कोट्यवधी रुपयांची कमाई करते 'या' क्रिकेटरची पत्नी; वार्षिक कमाई ऐकून चाट पडाल...
भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंच्या कमाईचा आकडा हा भुवया उंचावणारा आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून तर भारतीय क्रिकेट विश्वातील खेळाडूंना सोन्याचे दिवस आले आहेत. त्यामुळे हे खेळाडूच नाही तर त्यांच्या अनेक पत्नी देखील आपले नशीब व्यवसायात आजमावत नवीन उंची गाठत आहेत. भारतीय संघातील नामवंत खेळाडूंपैकी एक असलेल्या शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली परुलकर ही देखील व्यवसायात आपले नशीब आजमावताना दिसत आहे. मितालीचे बेकरी स्टार्टअप आहे. तिने आपल्या स्टार्टअपमधून करोडो रुपयांची कमाई करत आहे.
2 ते 3 कोटी रुपयांची कमाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मितालीचे महाराष्ट्रातील ठाण्यात ऑल जॅझ बेकरी नावाचे स्टार्टअप आहे. त्यांची बेकरी ही शहरातील सर्वात प्रसिद्ध बेकरी आहे. जिची सुरुवात त्यांनी २०२० मध्ये केली होती. ऑल दॅट जॅझ – लक्झरी बेकरी ही विविध प्रकारचे केक, कुकीज, ब्रेड, बन्स इत्यादींची विक्री करते. मितालीने या व्यवसायातून वार्षिक तब्बल 2 ते 3 कोटी रुपयांची कमाई करत आहे.
हे देखील वाचा – पुढील आठवड्यात शेअर बाजारात दाखल होणार ‘हे’ दोन आयपीओ; गुंतवणूकीसाठी राहा तयार!
अभ्यासातही पुढे आहे मिताली
मिताली अभ्यासातही पुढे आहे. तिचा जन्म मुंबईत 1992 मध्ये एका उच्चवर्गीय कुटुंबात झाला. मितालीचे वडील मोठे उद्योगपती आहेत. तिचे प्राथमिक शिक्षण मुंबईतच झाले. तिने वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आणि सीए होण्याचा निर्णय घेतला. मात्र, नंतर तिने कॉर्पोरेट जगतात प्रवेश केला. मिताली एका कंपनीत कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करत होती. काही काळ काम केल्यानंतर तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच तिने ठाण्यात ऑल जॅझ बेकरी नावाचे स्टार्टअप सुरु केले आहे.
कधी कले होते लग्न
शार्दुल ठाकूरने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मितालीसोबत लग्न केले होते. लग्नाआधी दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शार्दुल आणि मिताली दोघेही एकमेकांना शाळेच्या वेळेपासून ओळखतात. शालेय जीवनापासूनच दोघांमध्ये मैत्री होती. त्यांच्या याच मैत्रीचे रुपांतर लग्नात झाले आहे.
सोशल मीडियावरही असते ॲक्टिव्ह
विशेष म्हणजे मिताली ही सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास 62 हजार फॉलोअर्स आहेत. आणि ती 190 वापरकर्त्यांना फॉलो करते. तिने आतापर्यंत इंस्टाग्रामवर केवळ 91 पोस्ट केल्या आहेत. शार्दुल ठाकूर व्यतिरिक्त धोनी, विराट कोहली, पृथ्वी शॉ, रोहित शर्मा, झहीर खान इत्यादी क्रिकेटपटू ज्यांना मिताली फॉलो करते.