Old Monk High Court Order : ओल्ड मंकला पुन्हा झटका! हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश?

Old Monk High Court Order : लोकप्रिय ब्रँड ओल्ड मंकला उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला असून, उपलब्ध जुना स्टॉक ३० दिवसांच्या आत विकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ओल्ड मंकला पुन्हा झटका! हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश?
ओल्ड मंकला पुन्हा झटका! हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश? ( सौजन्य - सोशल मीडिया )
Published on: 
Updated on: 
  • ओल्ड मंकला पुन्हा झटका!

  • हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश?

  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

Old Monk High Court Order : ओल्ड मंकला पुन्हा न्यायालयाकडून धक्का बसणार आहे. ओल्ड मंकची निर्मिती करणाऱ्या मोहन मेकिन लिमिटेडला दिल्ली उच्च न्यायालयाने थेट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे नेमका काय परिणाम होणार आहे. आणि त्याचा मद्यप्रेमींवर काय परिणाम होणार ?

ओल्ड मंकला पुन्हा झटका! हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश?
Bank UPI Transaction : UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय? देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय; काय परिणाम होणार?

न्यायालयाने कंपनीला त्यांच्या iQ जिनची सध्याच्या बाटली आणि लेबल डिझाइनमध्ये विक्री करण्यास मनाई केली आहे. कंपनीचा दावा आहे की, iQ जिनचे सध्याचे पॅकेजिंग त्यांच्या 'ग्रेटर दॅन' जिनसारखेच आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अंतरिम आदेशात, न्यायालयाने कंपनीला आपला सध्याचा साठा विकण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर, जुन्या डिझाइनच्या उर्वरित बाटल्या दुकानांमधून काढून टाकाव्या लागतील. पण, कंपनीला आपला iQ ब्रँड वापरणे आणि वेगळ्या डिझाइनमध्ये जिन विकणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे प्रकरण नाऊ स्पिरिट्स अँड बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड या 'ग्रेटर दॅन' जिन बनवणाऱ्या कंपनीच्या तक्रारीशी संबंधित आहे. कंपनीचा दावा आहे की तिच्या जिनच्या बाटलीचा आकार, काळ्या-पांढऱ्या रंगांचा वापर, काळे झाकण आणि लेबलची रचना आयक्यू जिन सारखीच आहे. नाऊ स्पिरिट्सच्या मते, 'ग्रेटर दॅन' जिन भारतात 2016 मध्ये सादर करण्यात आले आणि कंपनीने या पॅकेजिंगद्वारे बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. तर, मोहन मीकिनने ऑगस्ट २०२३ मध्ये iQ जिन लाँच केले.

न्यायालयाने बंदी का घातली?

न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव म्हणाले की, प्रथमदर्शनी iQ जिनच्या सध्याच्या पॅकेजिंगमुळे ग्राहकांना दोन ब्रँडमधील कनेक्शन किंवा संबंध असल्याचा संशय येऊ शकतो. कोर्टाने मान्य केले की नाऊ स्पिरिट्सने त्याच्या उत्पादनाच्या पॅकेजिंगची कॉपी करण्यात आल्याची एक भक्कम प्रथमदर्शनी केस मांडली होती.

मात्र, मोहन मेकीन यांना 'आयक्यू' नाव किंवा ट्रेडमार्क वापरण्यापासून रोखण्यात आलेले नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. कंपनी आपले जिन विकू शकते, पण ती 'ग्रेटर दॅन' वाटू नये म्हणून बाटलीचा आकार, लेबल, रंगांची मांडणी आणि लेखनाची रचना यात बदल करावा लागेल.

जुन्या साठ्यासाठी ३० दिवसांची मुदत

न्यायालयाने मोहन मेकीन यांना दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. यामध्ये कंपनीला सध्याच्या पॅकेजिंगमध्ये iQ जिनचा साठा आहे, तो सोबत आहे, वितरकाकडे आहे की वाटेत आहे, याची माहिती द्यावी लागेल. कंपनीला जुना स्टॉक लिक्विडेट करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

पण, कंपनीला या डिझाइनमध्ये नवीन स्टॉक तयार करण्यास, बाटलीबंद करण्यास किंवा नवीन ऑर्डर देण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. मात्र, कंपनीला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करता यावे, यासाठी जुना स्टॉक पुन्हा बाटलीबंद करून नवीन लेबल लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ओल्ड मंकला पुन्हा झटका! हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश?
Finance Ministry Report Q3 Economy : भारतीय अर्थव्यवस्थेची गती पुन्हा सुसाट? वित्त मंत्रालयाच्या अहवालात महत्त्वाचे संकेत; बदलाचा पॅटर्न काय?