Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OYO च्या हॉटेल्समध्ये आता लग्न न झालेल्या जोडप्यांना नो एंट्री ! ‘या’ शहरापासून नव्या पॉलिसीला सुरुवात

ओयोच्या नवीन गाइडलाइन्स तत्त्वांनुसार, अविवाहित जोडप्यांना व्हॅलिड पुराव्याशिवाय ओयोच्या हॉटेल रूममध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. चला या नवीन नियमांबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 05, 2025 | 08:22 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

ओयो म्हंटलं की अनेकांना आठवते ते बेस्ट हॉटेलिंग सर्व्हिस आन राहण्याची उत्तम सोया. पण एकीकडे ओयोची चांगली प्रतिमा जरी असली तरी दुसरीकडे लोकांचा असा देखील समज आहे की ओयोचा वापर मुख्यतः न विवाहित जोडपे जास्त करत असतात. हाच समज दूर करण्यासाठी ओयो ब्रँडने एक जाहिरात देखील बनवली होती, जिथे त्यांनी ओयो मधील रूम्स फक्त जोडप्यांसाठीच नव्हे तर कुटुंबासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे, असे दाखवले होते. शेवटी, आता प्रेमी युगलांसाठी ओयोने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय, चला जाणून घेऊया?

हॉटेल आणि ट्रॅव्हल बुकिंग कंपनी ओयोने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा नियम तयार केला आहे. आतापासून, अविवाहित जोडप्यांना ओयोमध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. या निर्णयानंतर अनेक जणांनी कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अनिल कपूर बनले कम्युनिटी मॅट्रिमोनीचे ब्रँड ॲम्बेसेडर; चार विशिष्ट समुदायांसाठी मोहिमेची सुरुवात

प्रेमी युगलांसाठी बॅड न्यूज

Oyo ने पार्टनर हॉटेल्ससाठी नवीन चेक-इन पॉलिसी सुरू केली आहे, जी या वर्षापासून लागू होईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलच्या खोल्यांमध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कंपनीने याची सुरुवात मेरठपासून केली असून त्यासाठी नवा नियम बनवला आहे. जो प्रेमी युगल वेळ घालवण्यासाठी ओयो हॉटेल्सकडे वळतात त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच चांगली नाही.

प्रत्येक जोडप्याला चेक इन करताना वैध कागदपत्रे दाखवावे लागेल

सुधारित पॉलिसीअंतर्गत, सर्व जोडप्यांना चेक-इनच्या वेळी त्यांच्या नातेसंबंधाचा वैध पुरावा सादर करण्यास सांगितले जाईल. यामध्ये ऑनलाइन बुकिंग देखील समाविष्ट आहे. OYO ने मेरठमधील आपल्या भागीदार हॉटेलांना याची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

HDFC आणि SBI च्या लाखो खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; मुदत ठेवींवरील व्याजात झालीये इतकी वाढ!

ओयोविरोधात दाखल करण्यात आली होती याचिका

खरंतर, काही शहरांतील रहिवाशांनी अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेलमध्ये चेक-इन करण्याची परवानगी न देण्यासाठी याचिका दाखल केली आहे. हे पाहता ओयोने आपल्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की OYO ने आपल्या भागीदार हॉटेलांना स्थानिक सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांच्या विवेकबुद्धीनुसार जोडप्यांची बुकिंग नाकारण्याचा अधिकार दिला आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार, इतर शहरांतील लोकांनीही ओयोला अविवाहित जोडप्यांना हॉटेल्समध्ये चेक-इन करण्यापासून रोखण्यासाठी एक धोरण बनवण्याची आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा मार्ग तयार करण्याची विनंती केली आहे.

Web Title: Oyo new check in policy now unmarried couples has to show their identity proof while check in

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 08:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.