फोटो सौजन्य - Social Media
भारताची अग्रगण्य वेड-टेक कंपनी मॅट्रिमोनी डॉट कॉमने ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची कम्युनिटी मॅट्रिमोनी सेवांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या सेवांच्या माध्यमातून मॅट्रिमोनी डॉट कॉम समुदाय-आधारित वैवाहिक प्लॅटफॉर्मच्या व्याप्तीचा विस्तार करण्याचा उद्देश ठेवत आहे. मुळात, यामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. भारतात जातीनिहाय विवाहांना मान्यता आहे. त्यामुळे यजमान्यांना आपल्या समाजातील मुलगी किंवा मुलगा विवाहासाठी शोधणे अतिशय सोपे होणार आहे. मॅट्रिमोनी डॉट कॉमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगवेल जानकीरामन यांनी या घोषणेनंतर सांगितले, “अनिल कपूर यांची प्रतिमा एक परिपूर्ण पती, काळजी घेणारे वडील आणि प्रेमळ आजोबा म्हणून प्रेरणादायक आहे. त्यांच्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीमुळे ते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. त्यांच्या विश्वासार्ह आणि आत्मीय व्यक्तिमत्त्वामुळे ते मॅट्रिमोनी डॉट कॉमसाठी योग्य चेहरा ठरतात.”
जानकीरामन पुढे म्हणाले की, मॅट्रिमोनी डॉट कॉम जानेवारी 2025 मध्ये टीव्ही जाहिरातींच्या माध्यमातून त्यांच्या 360-डिग्री मार्केटिंग मोहिमेचा शुभारंभ करणार आहे. या मोहिमेची सुरुवात लग्नाच्या हंगामाच्या मध्यभागी चार विशिष्ट समुदायांसाठी – ब्राह्मण मॅट्रिमोनी, राजपूत मॅट्रिमोनी, अग्रवाल मॅट्रिमोनी आणि कायस्थ मॅट्रिमोनी – जाहिराती प्रदर्शित करून होणार आहे. या सर्व जाहिरातींमध्ये अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असेल.
वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेद्वारे मॅट्रिमोनी डॉट कॉम विविध समुदायांना लक्ष्य करणार आहे. यामध्ये टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, आणि प्रिंट मीडिया यांचा समावेश असेल. मॅट्रिमोनी डॉट कॉम 200 हून अधिक समुदाय-आधारित सेवा ऑफर करते. जाती, धर्म, व्यवसाय, आणि विशिष्ट गटांनुसार वर्गीकृत या सेवा वैविध्यपूर्ण लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करतात. त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या आवडीनुसार जीवनसाथी शोधण्यास मदत होते. या सुविधांचा फायदा आता लोकांना घेता येणार आहे. विशिष्ट समुदायासाठी विशिष्ट साईट असल्यामुळे लोकांना याचा उत्तम फायदा होणार आहे.
मॅट्रिमोनी डॉट कॉमचा उद्देश भारतीय समुदायांमध्ये वैवाहिक सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवणे आहे. अनिल कपूर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची नियुक्ती हा या मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मॅट्रिमोनी डॉट कॉम अधिक व्यापक समुदायांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. जानेवारी 2025 पासून सुरू होणारी ही मोहीम मॅट्रिमोनी डॉट कॉमला आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी एक नवा टप्पा असेल.