Paisabazaar ने FD आणि कॉर्पोरेट बाँड्स केले लॉन्च, आता मिळू शकतो 13.25 टक्क्यांपर्यंत परतावा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Paisabazaar Launches FD and Corporate Bonds Marathi News: भारतातील अग्रगण्य डिजिटल कंझ्युमर क्रेडिट मार्केटप्लेस आणि फ्री क्रेडिट स्कोअर प्लॅटफॉर्म, पैसाबझारवर ग्राहक आता फिक्स्ड इनकम इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करून 13.25 टक्क्या पर्यंतचा परतावा मिळवू शकतात. अलीकडेच पैसाबझारने आपल्या प्लॅटफॉर्मवर फिक्स्ड डिपॉझिट (FD) ची सुरुवात केली आहे. त्याचबरोबर, कंपनीने SEBI-रेग्युलेटेड संस्थेसोबत भागीदारी करून कॉर्पोरेट बाँड्समध्ये गुंतवणुकीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
या लॉन्चसह पैसाबझार आपल्या गुंतवणूकदारांना त्रासमुक्त पद्धतीने उच्च परतावा देणाऱ्या फिक्स्ड इनकम पर्यायांपर्यंत पोहोचण्याचा उत्तम डिजिटल अनुभव एकाच प्लॅटफॉर्मवर देऊ इच्छित आहे.
पैसाबझारच्या CEO, संतोष अग्रवाल म्हणाल्या, “पैसाबझारमध्ये आमचं व्हिजन भारतासाठी असं प्लॅटफॉर्म तयार करणं आहे, जिथे आम्ही विविध प्रोडक्ट्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकू. फिक्स्ड इनकम साधनांच्या लॉन्चसह आम्ही आमच्या ग्राहकांना सोप्या आणि पारदर्शक डिजिटल प्रक्रियेद्वारे गुंतवणुकीचे व्यापक पर्याय उपलब्ध करून देत आहोत. आमचं उद्दिष्ट आमच्या ग्राहकांसाठी आयुष्यभराचा आर्थिक साथीदार होण्याचं आहे, जो त्यांच्या कर्ज घेण्याच्या आणि बचत करण्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात मदत करेल.”
पैसाबझार अॅपद्वारे ग्राहक विविध बँकांच्या FD ची तुलना करू शकतात आणि त्यांना सहजपणे बुक करू शकतात. यामध्ये बजाज फायनान्स, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, श्रीराम फायनान्स आणि साऊथ इंडियन बँक यांसारखी प्रमुख नावं समाविष्ट आहेत.
याशिवाय गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट बाँड्समधून 13.25 टक्क्या पर्यंतचा संभाव्य परतावा मिळू शकतो आणि यावरील व्याज मासिक किंवा तिमाही स्वरूपात मिळू शकतं. गुंतवणुकीची किमान रक्कम फक्त ₹1,000 पासून सुरू होते, ज्यामुळे हा पर्याय अधिकाधिक गुंतवणूकदारांसाठी सुलभ ठरतो. इतकंच नव्हे तर गुंतवणूकदार बाँड्सना यिल्ड, क्रेडिट रेटिंग आणि गुंतवणुकीची रक्कम अशा मापदंडांवर आधारित निवडू शकतात.
हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे की, पैसाबझारवर गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. गुंतवणूकदार त्रासाशिवाय ऑनलाइन FD आणि कॉर्पोरेट बाँड्समध्ये गुंतवणूक करू शकतात.
पैसाबझार सातत्याने आपल्या प्रोडक्ट्सच्या श्रेणीत वाढ करत आहे, ज्याचं उद्दिष्ट ग्राहकांना एका प्लॅटफॉर्मवरून माहितीपूर्ण आणि स्मार्ट आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम करणं आहे. हे लॉन्चही पैसाबझारच्या याच उद्दिष्टाचा भाग आहे.