Virar Papadkhind Dam : 'पापडखिंड'ची सुरक्षा वाऱ्यावर! लोकप्रतिनिधी, आयुक्तांसमोर पाण्यात छठपूजा; धरणात दुचाकी - रिक्षा धुण्याचे प्रकार वाढले

Virar Papadkhind Dam : विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातील हजारो कुटुंबांची तहान भागवणाऱ्या ऐतिहासिक पापडखिंड धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांच्या उपस्थितीत पाण्यात छठपूजा झाल्याच्या घटनेनंतर आता थेट धरणाच्या पाण्यात दुचाकी आणि रिक्षा धुण्याचे प्रकार वाढल्याने जलस्रोत प्रदूषित होत आहे.
Photo - Social Media
Virar Papadkhind DamVirar Papadkhind Dam
Published on: 
Updated on: 
  • 'पापडखिंड'ची सुरक्षा वाऱ्यावर!

  • लोकप्रतिनिधी, आयुक्तांसमोर पाण्यात छठपूजा

  • धरणात दुचाकी - रिक्षा धुण्याचे प्रकार वाढले

Virar Papadkhind Dam : विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातील हजारो कुटुंबियांची तहान भागवत असलेल्या पापडखिंड धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात छठपूजेच्यावेळी महापालिकेतील लोकप्रतिनिधी, स्वतः आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत थेट पिण्याच्या पाण्यात उतरून भाविकांनी धुमधडाक्यात उत्सव साजरा केला. हे कमी म्हणून की काय आता धरणाच्या थेट डोहात दुचाकी आणि रिक्षा नेऊन त्या धुण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

गेल्या आठवड्यात छठपूजेच्या निमित्ताने महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि स्वतः आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत भाविकांनी थेट पिण्याच्या पाण्यात उतरून उत्सव साजरा केला. धरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेनेच नियम धाब्यावर बसवून मूकसंमती दिल्याने आता धरणाच्या डोहात थेट दुचाकी आणि रिक्षा नेऊन धुण्याचे प्रकार राजरोसपणे वाढू लागले आहेत. एकीकडे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जात असताना, दुसरीकडे अस्तित्वात असलेला जलस्रोतच निष्काळजीपणामुळे प्रदूषित होत आहे.

रिक्षा व दुचाकी धुणाऱ्यांवर कारवाईचे धाडस दाखवणार का ?

सार्वजनिक जलाशयाचे पाणी अशुद्ध करणाऱ्यांविरुद्ध सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तर जलस्रोतात प्रदूषित घटक सोडण्यास सक्त मनाई आहे. तरीही लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाण्यात उतरून उत्सव धुमधडाक्यात साजरे होत असतील, तर रिक्षा व दुचाकी धुणाऱ्यांवर कारवाई करण्याचे नैतिक धाडस प्रशासन दाखवणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ तत्काळ थांबवून धरणाभोवती कडक सुरक्षाव्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.