आता रॅप ऐकून महिन्याचे खर्च कळणार! Paytm ने आणलाय AI आधारित 'हा' खास फिचर
हल्ली AI च्या वापरामुळे आपली कामं खूप सोपी झाली आहेत. कोणी AI च्या मदतीने शाळा, कॉलेज आणि ऑफिसचे काम करत आहे. तर कोणी फोटोमध्ये बदल करून ट्रेंड फॉलो करत आहे. मात्र, Paytm ने AI चा चांगलाच वापर केला आहे. नेमकं, त्यांनी काय केलं आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी पेटीएमने आपल्या ॲपमध्ये एआयद्वारे चालणारे अनोखा ‘प्लेबॅक’ फीचर लाँच केला आहे. हे फीचर मागील महिन्याच्या खर्चांना रॅप रीकॅपमध्ये रूपांतरित करते, ज्याद्वारे आर्थिक आकडेवारीला मनोरंजक, सर्जनशील आणि इंटरॅक्टिव्ह पद्धतीने सादर केले जाते.
Gold ETF: या धनत्रयोदशीला डिजिटल सोन्यात गुंतवा पैसा! टॉप 6 गोल्ड ETF नी दिला तब्बल 66 टक्के परतावा
‘प्लेबॅक’ फीचर पेटीएम ॲपच्या ‘बॅलन्स अँड हिस्ट्री’ विभागात उपलब्ध आहे. या फीचरमध्ये एआय तुमच्या मासिक खर्चांचा डेटा कस्टम रॅप वर्सेसमध्ये बदलतो. शॉपिंग, फूड, ट्रॅव्हल, युटिलिटी बिल्स आणि इतर सर्व व्यवहार रॅपच्या क्रिएटिव्ह लिरिक्समध्ये रूपांतरित होतात. यामुळे प्रत्येक महिन्याचा खर्च एक मजेदार आणि एंगेजिंग अनुभव बनतो. सध्या हे फीचर पेटीएमच्या निवडक हाय-ट्रान्झॅक्टिंग वापरकर्त्यांसाठी बीटा फेजमध्ये उपलब्ध आहे, आणि कंपनी वापरकर्त्यांच्या अभिप्रायावर आधारित अनुभव अधिक उत्तम करण्यासाठी काम करत आहे.
पेटीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “भारतातील पहिले AI-संचालित रॅप फीचर ‘प्लेबॅक’ खर्च ट्रॅकिंगला अधिक मनोरंजक बनवते आणि वापरकर्त्यांना त्यांच्या मासिक खर्चांवर नव्या दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रवृत्त करते. आजचे तरुण प्रत्येक गोष्टीकडे कंटेंट म्हणून पाहतात आणि तिथेच आम्हाला त्यांच्या मासिक खर्चाच्या स्टेटमेंटला अधिक एंगेजिंग आणि रिलेटेबल बनवायची संधी दिसली. वापरकर्ते आपल्या रॅप सॉंगसोबत ‘वाइब’ करताना खर्चाच्या सवयींबद्दल विचार करतील, ज्यामुळे वित्तीय जागरूकता वाढेल अशी आम्हाला आशा आहे.”
BSE शेअरवर गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढला, आयआयएफएलचे टार्गेट 2,300
पेटीएमवर मासिक खर्चाचा रॅप तयार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी ॲप उघडावे आणि खात्री करावी की ते लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट केलेले आहे की नाही. नंतर होम स्क्रीनवर जाऊन ‘बॅलन्स अँड हिस्ट्री’ विभागावर टॅप करावे. ‘पेटीएम प्लेबॅक’ बॅनरवर क्लिक केल्यावर मागील महिन्याच्या पेमेंट्सचा वैयक्तिक रॅप तयार होईल. एआय तुमच्या खर्चाचा डेटा मजेदार रॅप सॉंगमध्ये बदलून दाखवेल, आणि वापरकर्ते हा रॅप ऐकू शकतात तसेच मित्रांसोबत शेअर देखील करू शकतात.
हे नविन फीचर फक्त खर्च ट्रॅकिंगसाठी नव्हे, तर वित्तीय सवयींबाबत जागरूकता वाढवण्याचे साधन देखील आहे. यामुळे वापरकर्त्यांना खर्चाचा डेटा समजून घेणे आणि त्यावर योग्य निर्णय घेणे सोपे होईल, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक अनुभव अधिक एंगेजिंग आणि आकर्षक होईल.