Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ? विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

प्रशासनाची विकासकामं की अधोगतीची सुरुवात असा प्रश्न विचारण्याची वेळ कर्जतमधल्या शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यातील माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्ग 76 या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 03, 2026 | 01:17 PM
Karjat News : रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ? विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
Follow Us
Follow Us:
  • रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ?
  • विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचाा सवाल
 

कर्जत/ संंतोष पेरणे : प्रशासनाची विकासकामं की अधोगतीची सुरुवात असा प्रश्न विचारण्याची वेळ कर्जतमधल्या शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यातील माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्ग 76 या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.या रस्त्यावर साडे पाच मीटर रुंदीचा काँक्रीटचा रस्ता बनणार आहे.त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडे तोडली जाणार आहेत आणि या शक्यतेने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रस्त्याचे रुंदीकरण केले जात असताना रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारे जमीन अधिग्रहीत करण्यात आलेली नसताना शेतकऱ्यांची पूर्व संमती न घेता रस्त्यावरील कामे सुरू असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.दरम्यान,रस्त्यावर आपल्या मालकीच्या जागेत खोदकाम करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे,तर झाडे तोडण्यास विरोध करीत आहेत.

माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ रेल्वे फाटक ते पोही फाटा या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे.न व्याने या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार असल्याने शेतकऱ्यांची जमीन देखील वापरली जाणार आहे. त्या जमिनीचे कोणतेही अधिग्रहण शासनाने केलेले नाही आणि त्यामुळे हे सर्व शेतकरी आपली जमीन देण्यास तयार नाहीत. म्हणूनच रस्त्याचे काम करताना आपला पूर्वीचा रस्ता आहे तेवढाच रस्ता नव्याने बनवण्यात यावा अशी मागणी करीत आहेत.मात्र शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दहिवली पासून बिरदोले पर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अडवली आहेत.हा रस्ता पूर्वी तयार करण्यात आला त्यावेळी रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नव्हता.आता सरकार पुन्हा या रस्त्याचे रुंदीकरण करत असून त्यासाठी देखील येथील शेतकऱ्यांची जमीन वापरली जाणार आहे आणि त्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी करीत रस्त्याचे काम अडवून ठेवले आहे.

Raigad News: रायगडच्या शेतकऱ्यास ‘वालीच’ नाही! नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हतबल

हा रस्ता तयार केला जात असताना रस्त्याच्या आजुबाजूला असलेली झाडे तोडली जाणार आहेत आणि त्यामुळे शेतकरी आणखी संतापलेला आहे.शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होणार असून त्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी लावलेली झाडे देखील रस्त्यासाठी तोडली जाणार आहे.ती सर्व झाडे शेतकऱ्यांच्या आईवडिलांनी लावली असून वाढवली आहेत.झाडे तोडली जाणार हे मोठे दुःख या भागातील शेतकऱ्यांचे असणार आहे.रस्त्यासाठी झाडे तोडली जाणार असल्याने शेतकरी संतप्त आहे.त्यामुळं शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची मोजदाद करण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निघून जाण्यास सांगितले.आधी रस्त्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला द्या आणि नंतर रस्त्याचे काम करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांची कोणतीही झाडे तोडली जाऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

आगरी समाज संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांचा जमीन रस्त्यासाठी देण्यास विरोध असून रस्ता रुंदीकरण करू नये आणि झाडे तोडली जाऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मात्र तरी देखील शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास शेतकऱ्यांची जी भूमिका असेल त्या भूमिके सोबत जात आमची कर्जत तालुका आगरी समाज संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.समाज संघटनेचे वतीने रस्त्याच्या दुतर्फा जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत या रस्त्याचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन बांधकाम खात्याचे उप अभियंता यांना दिले आहे.

Matheran Municipal Council: माथेरान नगरपरिषद आर्थिक संकटात; पालिकेची ३५ लाखांची थकीत वीजबिले

Web Title: Karjat newswill trees be sacrificed for reral matheran kalamn state highway work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
2

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट
4

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.