पैसे घेऊन उभे आहेत लोक, तरीही बाजारात मिळेना ही गाडी; बुकिंग केल्यानंतर 1.5 वर्ष करावी लागतीये चावीची प्रतिक्षा!
दिवाळीनिमित्त सध्या अनेकजण कार खरेदीचा करण्याचा विचार करत आहे. मात्र, आता तुम्ही देखील महिद्रांची थार रॉक्स खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर महिद्रांची थार रॉक्स लाँच करण्यात आली. थार रॉक्स लॉन्च झाल्यापासून या एसयूव्हीला देशभरात खूप मागणी आहे. 3 ऑक्टोबर रोजी थार रॉक्सचे बुकिंग सुरू होताच, अवघ्या 1 तासात 1 लाख 76 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. थार रॉक्सचे बुकिंग जसजसे वाढत आहे, तसतसा त्याचा प्रतीक्षा कालावधीही वाढत आहे.
प्रतीक्षा कालावधी पोहोचला 1.5 वर्षांपर्यंत
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीच्या माहितीनुसार, थार रॉक्स खरेदी करण्याचा प्रतीक्षा कालावधी हा 1.5 वर्षांपर्यंत पोहोचला आहे. तुम्ही आज ऑर्डर केल्यावर थार रॉक्सची डिलिव्हरी ही तुम्हांला 2026 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. थार रॉक्सची मागणी वाढल्याने प्रतीक्षा वेळ लवकरच एक-दोन वर्षांपर्यंत पोहोचेल, असे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
महिंद्रा थार रॉक्सचे इंजिन
थार रॉक्स ही ऑफ-रोड एसयूव्ही आहे. या वाहनाचा पेट्रोल प्रकार फक्त 2-व्हील ड्राइव्हसह उपलब्ध आहे. या एसयूव्हीमध्ये 2.0 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनसह, मॅन्युअल ट्रान्समिशनवर 162 एचपी पॉवर आणि 330 एनएम टॉर्क उपलब्ध आहे. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर 177 एचपी पॉवर आणि 380 एनएम टॉर्क जनरेट होतो.
2.2 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय
महिंद्रा थार रॉक्समध्ये 2.2 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय देखील आहे. जो मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर 152 एचपी पॉवर आणि 330 एनएम टॉर्कची निर्मिती करतो. 4 डब्लूडीचा पर्याय डिझेल इंजिन प्रकारांमध्ये देखील उपलब्ध आहे.
हे देखील वाचा – घर खरेदीचे स्वप्न सत्यात उतरणार, खरेदीदारांना विविध पर्याय उपलब्ध होणार!
थार रॉक्सची कितीये किंमत
महिंद्रा थार रॉक्स सात कलर व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये 26.03 सेंटीमीटर ट्विन डिजिटल स्क्रीन आहे. कारमध्ये पॅनोरामिक स्कायरूफ देखील देण्यात आले आहे. या महिंद्रा एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 22.49 लाख रुपयांपर्यंत जाते.
त्यामुळे आता तुम्हीही स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लॉन्च झालेली महिंद्रा थार रॉक्स खरेदी करणार असाल तर तुम्हांला जवळपास दोन वर्षापर्यंतचा वेटिंग परियड पार करावा लागू शकतो. अर्थात महिंद्रा थार रॉक्स तात्काळ खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तरी देखील तुम्ही हा दोन वर्षांचा कालावधी पार केल्याशिवाय ही गाडी खरेदी करू शकणार नाही.