Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर… दसरा-दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; कच्च्या तेलाचे भाव 3 वर्षांतील नीच्चांकी पातळीवर!

सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या या बदलामुळे भारतातील सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती अनेक वर्षांतील नीचांकी पातळीवर गेल्याने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 11, 2024 | 03:35 PM
खुशखबर... दसरा-दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; कच्च्या तेलाचे भाव 3 वर्षांतील नीच्चांकी पातळीवर!

खुशखबर... दसरा-दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; कच्च्या तेलाचे भाव 3 वर्षांतील नीच्चांकी पातळीवर!

Follow Us
Close
Follow Us:

विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एएफपीच्या अहवालात असे म्हटले आहे कि, मंगळवारी (ता.१०) ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली आली आहे. डिसेंबर 2021 नंतर ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलरच्या खाली गेली आहे. एएफपीच्या माहितीनुसार, जगभरातील आर्थिक वाढ मंदावल्याबाबत चिंता वाढली आहे. या चिंतेचा कच्च्या तेलाच्या मागणीवर परिणाम झाला असून, त्याचा परिणाम ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतींवर दिसून येत आहे.

69.15 प्रति बॅरलपर्यंत घसरण

मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत 3.7 टक्क्यांनी घसरून, 69.15 प्रति बॅरल झाली आहे. त्याच वेळी, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची किंमत 4.1 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 65.90 डॉलर झाली आहे. कच्च्या तेलाची ही गेल्या 3 वर्षांतील नीचांकी पातळी आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किरकोळ किमती कमी करण्याचा विचार करावा, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, आज कच्च्या तेलाच्या किमतीत अल्प वाढ दिसून आली आहे. बुधवारी (ता.११) ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 1.49 टक्क्यांच्या वाढीसह 70.22 डॉलर व्यापार करत आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 1.49 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 66.73 डॉलरवर व्यापार करत आहे.

6 महिन्यांपासून दर ‘जैसे थे’

देशातील तीन सरकारी तेल कंपन्या, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम, किरकोळ डिझेल आणि पेट्रोल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार तिन्ही कंपन्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत बदल करतात. जवळपास 6 महिन्यांपासून डिझेल आणि पेट्रोलच्या किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही. यापुर्वी 14 मार्च 2024 रोजी सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत शेवटचा दिलासा देण्यात आला होता. त्यावेळी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2-2 रुपये कपात करण्यात आली होती.

हे देखील वाचा – 3000 कोटींच्या संपत्तीची मालकिण; ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिला उद्योजक!

सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता

डिझेल आणि पेट्रोलच्या दरातील बदलांना निवडणुकीशी देखील जोडले जात आहे. मार्च 2024 मध्ये देशात लोकसभा निवडणुका होणार असताना, शेवटच्या वेळी किमतीत कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा जनतेला दिलासा देऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. सध्या दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, देशातील अनेक राज्यांमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या दरांनी प्रति लिटर 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

दसरा-दिवाळीपूर्वी पेट्रोल- डिझेल स्वस्त होणार

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठवड्याभरात ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 8 टक्क्यांनी घसरली आहे. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची किंमत सुमारे 6 टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे हा संपुर्ण आठवडा कच्च्या तेलाच्या किमतीत घसरणीचा कल नोंदवला गेला आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता कच्चे तेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. तेल उत्पादक देशांकडून उत्पादन कपातीमुळे अपेक्षित असलेला पाठिंबाही तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. ओपेक प्लसमध्ये समाविष्ट देशांनी उत्पादन वाढवण्याची योजना ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे मान्य केले आहे. एकूणच दसरा-दिवाळीपूर्वी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात आणखी कपात होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Petrol diesel price cut before dussehra diwali crude oil prices at the lowest level in 3 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 03:31 PM

Topics:  

  • Crude Oil Prices
  • Diesel Petrol Price

संबंधित बातम्या

Saudi Arabia Faces $220 Billion- मोदी सरकारचा धाडसी निर्णय! सौदी अरेबियाला $220 अब्जांचा जबरदस्त झटका! जाणून घ्या संपूर्ण  प्रकरण
1

Saudi Arabia Faces $220 Billion- मोदी सरकारचा धाडसी निर्णय! सौदी अरेबियाला $220 अब्जांचा जबरदस्त झटका! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

जुलै २०२५ मध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत ८.७ टक्के घट, रशियावरील अवलंबित्वामुळे संकट आणखी वाढले
2

जुलै २०२५ मध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत ८.७ टक्के घट, रशियावरील अवलंबित्वामुळे संकट आणखी वाढले

Oil Market : अमेरिकाही भारताकडून तेल खरेदी करते मग तरीही ट्रम्प का आहेत खार खाऊन? वाचा सविस्तर…
3

Oil Market : अमेरिकाही भारताकडून तेल खरेदी करते मग तरीही ट्रम्प का आहेत खार खाऊन? वाचा सविस्तर…

पुन्हा महागणार पेट्रोल? ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, कारण काय? जाणून घ्या
4

पुन्हा महागणार पेट्रोल? ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, कारण काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.