Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ शेतकरी आहे एका ट्रेनचा मालक, अंबानी-अदानींना जमलं नाही ते पठ्ठयाने करुन दाखवलं!

संपूर्ण सिंह या पंजाबच्या लुधियाना येथीस कटाणा गावच्या शेतकऱ्याकडे स्वत:च्या मालकीची एक संपुर्ण ट्रेन आहे. त्यामुळे उद्योगपती अंबानी-अदानींना कधी ट्रेन विकत घेता आली नाही. मात्र या शेतकऱ्याकडे स्वत:च्या मालकीची ट्रेन असल्याने, त्याची सर्वदुर चर्चा होत आहे. त्यामुळे आता तुम्ही याबाबत ऐकून चक्रावल्याशिवाय राहणार नाही.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 27, 2024 | 07:02 PM
'हा' शेतकरी आहे एका ट्रेनचा मालक, अंबानी-अदानींना जमलं नाही ते पठ्ठयाने करुन दाखवलं!

'हा' शेतकरी आहे एका ट्रेनचा मालक, अंबानी-अदानींना जमलं नाही ते पठ्ठयाने करुन दाखवलं!

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वेने प्रवास करत असताना एखाद्या व्यक्तीसोबत वादावादी होणे हे काही नवीन नसते. अशावेळी आपण समोरच्याला रेल्वे काय तुझ्या बापाची आहे का? असे बोलून जातो. त्यामागे रेल्वे ही सरकारच्या मालकीची असल्याचे आपल्याला त्याला सांगायचे असते. मात्र, आता एखाद्या व्यक्तीच्या नावावर एक संपुर्ण रेल्वे आहे असे सांगितले तर तुम्ही चाट पडल्याशिवाय राहणार नाही.

मिळालीये कायदेशीर मान्यता

मात्र हे खरे आहे. भारतातील एका शेतकऱ्याच्या मालकीची संपुर्ण रेल्वे आहे. विशेष म्हणजे स्वत:च्या मालकीची एक संपुर्ण ट्रेन असलेला हा शेतकरी एकमेव भारतीय व्यक्ती आहे. याशिवाय या शेतकऱ्याला ट्रेनच्या मालकीची कायदेशीर मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे आता मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींकडे देखील रेल्वेची मालकी नसताना, या शेतकऱ्याने ट्रेन विकत घेतलीच कशी? याबाबत तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल. याच बाबत आज आपण जाणून घेणार आहोत…

हेही वाचा – झी-सोनी यांच्यातील वाद अखेर मिटला; झी इंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये तब्बल 11 टक्क्यांनी उसळी!

काय आहे संपुर्ण प्रकरण

संपूर्ण सिंह असे या शेतकऱ्यांचे नाव असून, ते पंजाबच्या लुधियाना येथीस कटाणा गावचे रहिवासी आहेत. 2017 मधील हे प्रकरण असून, एक दिवस अचानक ते दिल्ली ते अमृतसर जाणारी ट्रेन स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेसची मालकी त्यांना मिळाली आहे. लुधियाना-चंदीगढ रेल्वे मार्गासाठी 2007 मध्ये रेल्वेने शेतकऱ्यांच्या काही जमिनी खरेदी केल्या होत्या. त्यावेळी संपूर्ण सिंह यांची जमीनही त्याच मार्गावर होती. रेल्वेने 25 लाख रुपये देत, त्यांच्या जमिनीचे अधिग्रहण केले. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी संपूर्ण सिंह यांना लक्षात आले की, रेल्वेने तितकीच जमीन शेजारच्या गावात 71 लाख रुपये प्रति एकरमध्ये खरेदी केली आहे.

शेतकरी संपूर्ण सिंह यांची न्यायालयात धाव

रेल्वेना त्यांना दिलेल्या कमी नुकसान भरपाईविरोधात संपूर्ण सिंह यांनी न्यायालयात धाव घेतली. कोर्टाच्या सुनावणीत रेल्वेने त्यांना नुकसान भरपाई म्हणून 25 लाखांचे 50 लाख रुपये देण्यात यावे, असे आदेश दिले. त्यांनतर कोर्टाने ही रक्कम वाढून 1.47 कोटी इतकी झाली. कोर्टाने नॉर्थ रेल्वेला आदेश दिले की, 2015 पर्यंत संपूर्ण सिंह यांना तितकी रक्कम देण्यात यावी. मात्र, रेल्वेने संपुर्ण सिंह यांना केवळ 42 लाख रुपये दिले. रेल्वे विभाग संपुर्ण सिंह यांना 1.05 कोटी रुपये देण्यास असमर्थ ठरला.

न्यायालयाकडून ट्रेनच्या जप्तीचे आदेश

परिणामी, 2017 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जसपाल वर्मा यांनी लुधियाना स्थानकावर ट्रेन जप्त करण्याचे आदेश दिले. यासोबतच स्टेशन मास्तरचे कार्यालयही जप्त करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकरी संपूर्ण सिंह स्टेशनवर पोहोचले आणि त्यांनी त्यावेळी तिथे उपस्थित असलेली अमृतसर स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस ट्रेन जप्त केली आणि त्या ट्रेनचे मालक झाले. त्यामुळे ते देशातील एकमेव व्यक्ती आहे. ज्यांच्याकडे एका ट्रेनची मालकी आहे.

Web Title: Punjab farmer sampurna singh is the owner of a train ambani adani failed to buy railways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 06:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.