नोकरी सोडा... स्टार्टअप सुरू करा; सरकार देणार महिना 25000 रुपये; वाचा... काय आहे 'ही' योजना!
नोकरी सोडा… स्टार्टअप सुरू करा आणि दर महिन्याला २५,००० रुपये मिळवा. असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हीही छोटा-मोठा व्यवसाय सुरु केल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकार तरुणांना स्टार्टअप सुरु करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देते. अशातच तुम्हाला नोकरी सोडा… स्टार्टअप सुरू करा आणि दर महिन्याला २५,००० रुपये कमवा, याबाबत समजले तर तुम्हीही व्यवसायात उतरल्याशिवाय राहणार नाही.
तरुणांना पाठिंबा देण्यासाठी सरकारची योजना
कर्नाटक सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या घोषणेनुसार, नोकरी सोडा… स्टार्टअप सुरू करा आणि दर महिन्याला २५,००० रुपये मिळवा. असे सांगण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही व्यक्तीसाठी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणे हा अत्यंत कठीण निर्णय असतो.
सर्वात मोठी समस्या पगारावर अवलंबून असलेल्या खर्चाशी संबंधित असते. पहिल्या दिवसापासून कोणत्याही व्यवसायात कमाई सुरू होत नाही. त्यास बराच वेळ जातो. या चिंतेमुळे अनेकांना व्यवसाय सुरू करता येत नाही. मात्र, आता कर्नाटक सरकारने अशा तरुणांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : खातेधारकांना फटका… ‘या’ बँकेने कर्जावरील व्याजदर वाढवले; ईएमआयमध्ये होणार वाढ!
काय म्हटलंय कर्नाटक सरकारने?
कर्नाटक सरकारने म्हटले आहे की, “जर एखाद्या व्यक्तीला कर्नाटकमध्ये स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे असेल. तर त्याने नोकरीची चिंता करू नये. नोकरी सोडून कर्नाटकात तुमचा स्टार्टअप सुरू करा. त्या व्यक्तीला राज्य सरकारकडून दरमहा २५ हजार रुपये दिले जातील.” कर्नाटकच्या आयटी-बीटी मंत्री प्रियंका खर्गे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात याबाबत घोषणा केली आहे.
काय आहेत अटी?
ही आर्थिक मदत नवउद्योजकांना एका वर्षासाठी दिली जाणार आहे. या रकमेमुळे स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना आर्थिक आधार मिळेल आणि ते त्यांच्या स्टार्टअपवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योगाची उभारणी कर्नाटकात करणे आवश्यक आहे.