खातेधारकांना फटका... 'या' बँकेने कर्जावरील व्याजदर वाढवले; ईएमआयमध्ये होणार वाढ!
दोनच दिवसांपूर्वी देशातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफडी बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर आता देशातील आणखी एका आघाडीच्या बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता तुम्हीही ‘या’ बँकेचे खातेधारक नाही ना? कारण कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यात आल्याने तुमचा ईएमआय वाढणार आहे. परिणामी, तुम्हाला आता मोठा झटका बसणार आहे.
कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार
देशातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. बँकेने ३ महिने, ६ महिने आणि १ वर्षाच्या कालावधीसाठी आपल्या लेंडिंग रेट्समध्ये 5 बीपीएस पॉइंटसची वाढ केली आहे. हे नवे दर १२ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणाार आहेत. याचसोबत बँक मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग रेट्स (एमसीएलआर) देखील वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता बँकेच्या कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.
हेही वाचा : बँक खात्यासाठी आता 4 नॉमिनी लावता येणार; लोकसभेत बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक सादर!
५ बेसिस पॉइंटने वाढ
बँक ऑफ बडोदाने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिग रेट्स (एमसीएलआर) मध्ये बदल केले आहे, असे सांगितले होते. हे नवे दर १२ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणार आहे. बँक फायलिंगनुसार, बँक ऑफ बडोदाने ३ महिन्यांच्या एमसीएलआरमध्ये ८.४५ वरुन ८.५० टक्के इतकी वाढ केली आहे. तर ६ महिन्यांच्या एमसीएलआरमध्ये ८.४० टक्क्यांवरुन ८.४५ टक्के वाढवण्यात येणार आहे. तर १ वर्षाच्या कालावधीसाठी एमसीएलआर ८.९० टक्क्यांवरुन ८.९५ टक्के करण्यात येणार आहे. प्रत्येक कालावधीसाठी ५ बेसिस पॉइंट वाढवण्यात आले आहेत.
एमसीएलआरमध्ये ८.३५ टक्क्यांपर्यंत वाढ
एक बेसिस पॉइंट हा टक्केवारीचा १०० वा हिस्सा असतो. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. बँक ऑफ बडोदाने आपला एमसीएलआर ८.१५ टक्क्यावरुन वाढवून ८.३५ टक्के केला आहे. यामुळे ग्राहकांचा ईएमआय वाढणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१६ साली एमसीएलआर जाहीर केला होता. एमसीएलआर हे एक बेंचमार्क व्याजदर आहे. हे दर बँक आपल्या लेडिंग रेट्सनुसार ठरवते. बँक या दरावर ग्राहकांना लोन देते. एमसीएलआर वाढल्याने ग्राहकांचे व्याजदर वाढणार आहे. त्यामुळे ईएमआय भरताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे.