आरबीआयने सर्वसामान्यांना दिला धक्का! गृहकर्जाच्या EMI वर काय परिणाम होणार? वाचा एका क्लिकवर (फोटो सौजन्य-X)
RBI Repo Rate News in Marathi : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आज (6 जुलै) सकाळी 10 वाजता त्यांचं चलनविषयक धोरण जाहीर करण्यात आलं. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं की , आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. याचाच अर्थ रेपो दर ५.५० टक्क्यांवर कायम राहील. म्हणजेच कर्जे महाग होणार नाहीत आणि तुमचा EMI देखील वाढणार नाही. RBI ने आपला चलनविषयक धोरणाचा दृष्टिकोन ‘तटस्थ’ ठेवला आहे. RBI ने जूनमध्ये व्याजदर ०.५०% ने कमी करून ५.५% केला होता. फेब्रुवारी, एप्रिल आणि जून प्रमाणे यावेळीही MPC रेपो दर कमी करेल अशी अपेक्षा होती. मागील MPC बैठकीत रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५० टक्के करण्यात आला होता.
RBI ने जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेचा हवाला दिला आणि असेही म्हटले की, मागील दराचा काय परिणाम होईल हे पाहण्यासाठी वेळ हवा आहे. MPC चे सर्व ६ सदस्य दर कमी न करण्याच्या बाजूने सहमत झाले. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्येही RBI ने रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने आणि २५ बेसिस पॉइंट्सने कमी केला होता. म्हणजेच, ३ वेळा रेपो दर १ टक्क्यांनी कमी करण्यात आला. सध्या, रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेनंतर, तुमच्या गृहकर्ज आणि कार कर्जासह सर्व कर्जांवर आकारले जाणारे व्याजदर आणि ईएमआयमध्ये स्थिरता अपेक्षित आहे.
जीडीपी वाढीच्या अंदाजात कोणताही बदल केलेला नाही. आर्थिक वर्ष 2026 मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के ठेवण्यात आला आहे. त्याच वेळी, पहिल्या तिमाहीसाठी तो 6.5 टक्के ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी तो 6.7 टक्के, तिसऱ्या तिमाहीसाठी 6.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीसाठी 6.3 टक्के ठेवण्यात आला आहे.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आर्थिक वर्ष 26 साठी सीपीआय चलनवाढीचा अंदाज 3.7% वरून 3.1% पर्यंत कमी केला आहे.
कोणत्याही मध्यवर्ती बँकेकडे पॉलिसी रेटच्या स्वरूपात महागाईशी लढण्यासाठी उपयोगी ठरते. जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा मध्यवर्ती बँक पॉलिसी रेट वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करते. जर पॉलिसी रेट जास्त असेल तर बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होईल. त्या बदल्यात बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कर्जे महाग करतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी होतो. जेव्हा पैशाचा प्रवाह कमी असतो तेव्हा मागणी कमी होते आणि चलनवाढ कमी होते.