Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचे कृषी कर्ज

शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तारणमुक्त कर्जाची रक्कम 2 लाख रुपये केली आहे. वाढीचा हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 14, 2024 | 09:27 PM
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचे कृषी कर्ज

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचे कृषी कर्ज

Follow Us
Close
Follow Us:

देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तारणमुक्त कर्जाची रक्कम 2 लाख रुपये केली आहे. वाढीचा हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. विशेष बाब म्हणजे या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणतही तारण न ठेवता 2 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. यापूर्वी 1.60 लाख रुपयांचे कर्ज मिळत होते. या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येतही वाढ होणार आहे. दरम्यान, याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शेतकऱ्यांसाठी कोणतेही तारण न घेता कर्ज मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये केली आहे. जी 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ; 14 जून 2025 पर्यंत असेल संधी!

अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) कर्जाचा सहज प्रवेश सुलभ होणार आहे. सरकारच्या सुधारित व्याज सवलत योजनेला पूरक ठरेल, जी 4 टक्के प्रभावी व्याज दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते.

या उपक्रमाकडे कृषी क्षेत्रातील आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी कार्यात गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या अनेक खाजगी क्षेत्रातील बँका कर्जावर 8 टक्के ते 12 टक्के व्याजदर आकारत आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांच्या जाळ्यात अडकण्यापासून शेतकरी वाचतील. असे सांगितले जात आहे.

मॅगी महागणार, वाचा… नेमकी का होणार दोन मिनिटांत झटपट होणाऱ्या मॅगीची दरवाढ?

नवीन वर्षात आरबीआय घेणार मोठा निर्णय

नवीन वर्षात कर्जदारांना आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कारण नवीन वर्षात व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. आरबीआयने सलग अकराव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही. तज्ज्ञांच्या मते व्याजदर कपातीचा निर्णय 2025 च्या सुरुवातीला होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून महागाईचा दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, नवीन वर्षात महागाईचा दर कमी होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे महागाईचा दर कमी आल्यास व्याजदरात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Reserve bank of india news farmers will get a loan of rs 2 lakh without any collateral from january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 09:27 PM

Topics:  

  • Interest rate

संबंधित बातम्या

PF Interest: 97% लोकांच्या खात्यात आले EPF चे 8.25% व्याज? तुम्हालाही मिळाले का? 4 पद्धतीने करा बॅलेन्स चेक
1

PF Interest: 97% लोकांच्या खात्यात आले EPF चे 8.25% व्याज? तुम्हालाही मिळाले का? 4 पद्धतीने करा बॅलेन्स चेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.