नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम (Russia-Ukraine Crisis) भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीवर होतो आहे. आज भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोने दरात (Gold Price Today) तब्बल १,६५६ रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा भाव (Silver Rate Today)२,३५० रुपयांनी वधारला आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर गुरुवारी सोन्याचा दर वाढून २०२२ च्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. MCX वर सोने दरात २१७८ रुपयांची वाढ झाली.
[read_also content=”अल्पवयीन मुलांमध्ये वाढलेले तंबाखूचे व्यसन भारतामध्ये वाढवत आहे कर्करोगाचे रुग्ण, २०३५ साली देश कॅन्सरची राजधानी होण्याची शक्यता – वैद्यकीय तज्ञांनी दिला धोक्याचा इशारा https://www.navarashtra.com/health/health/minor-childrens-tobacco-consumption-increasing-cancer-patients-in-india-nrsr-244699.html”]
सोन्याचा भाव
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव १,६५६ रुपये प्रति १० ग्रॅमने वधारला. या वाढीसह सोन्याचा दर ५१,६२७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर ४९,९७१ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.
चांदीचा भाव
दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात २,३५० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचा भाव ६६,२६७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव ६३,९१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचं चित्र आहे.