sensex down
मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावर (Share Market Update) कायम आहे. रशिया-युक्रेन वादाचा (Russia – Ukraine Dispute) भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले घसरणीचे सत्र आजही कायम राहिले. दिवसभरात सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे सेन्सेक्स व निफ्टीमध्ये घसरण नोंदविली गेली. आज निफ्टीवर मेटल इंडेक्स १ टक्क्यांनी घसरला. पीएसयू बँक, फार्मा आणि रिअल्टी शेअरवर विक्रीचा दबाव कायम राहिला. बँक आणि फायनान्शियल इंडेक्सची निफ्टीवर समाधानकारक कामगिरी राहिली. आज सेन्सेक्स ३८३ अंकांच्या घसरणीसह (Sensex Down By 383 Points) ५७,३००.६८ वर बंद झाला. निफ्टी ११४ अंक अंकांच्या घसरणीसह (Nifty Down By 114 Points) १७०९२ वर पोहोचला. सेन्सेक्स ३० पैकी २० शेअरवर घसरण झाली.
आजचे वाढलेले शेअर्स – एम अँड एम(१.४४),बजाज फिनसर्व्ह(१.११),आयसर मोटर्स(०.९८),ओएनजीसी (०.९५),हिंदाल्को(०.८२),
आजचे घसरलेले शेअर्स -बीपीसीएल (-३.६५), टाटा स्टील(-३.६५), टीसीएस(-३.५८), टाटा मोटर्स (-३.२८), एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (-२.९८)
गेल्या आठवड्याभरात युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटले. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर वातावरणातील तणाव निवळला होता. पश्चिमी देशांसोबत चर्चेची दारं खुली असल्याचं निवेदन केलं होतं. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविली गेली. सध्या कच्च्या तेलात २.५५ टक्क्यांची घसरण दिसून आली आणि ९४.२१ डॉलर प्रति बॅरल वर तेलाचे व्यापार सुरू आहेत. मात्र, पुन्हा एकदा वादानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांवर अनिश्चिततेचं सावट आहे.