Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅमसंग एजच्या नवव्या पर्वाला उदंड प्रतिसाद; तब्बल १५,०००हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

सॅमसंग एज या वार्षिक फ्लॅगशिप कॅम्पस कार्यक्रमाच्या नवव्या पर्वाच्या विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. या कार्यक्रमात यावर्षी ४० अव्वल शिक्षणसंस्थांमधून १५,०००हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. 

  • By नारायण परब
Updated On: Dec 05, 2024 | 06:18 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंग या भारतातील सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने आपल्या सॅमसंग एज (एम्पॉवरिंग ड्रीम्स गेनिंग एक्सलन्स) या वार्षिक फ्लॅगशिप कॅम्पस कार्यक्रमाच्या नवव्या पर्वाच्या विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. हा कार्यक्रम  तरुणांना त्यांचे व्यवसाय कौशल्य, धोरणात्मक विचार व नेतृत्व कौशल्य सर्वांपुढे मांडण्याची संधी देऊ करतो.यंदा ४० अव्वल शिक्षणसंस्थांमधून १५,०००हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला.

सहभागी झालेल्या शिक्षणसंस्थांमध्ये आघाडीच्या बी-स्कूल्स, इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि डिझाइन स्कूल्सचा समावेश होता. देशातील सर्वांत बुद्धिमान विद्यार्थ्यांपैकी काहींनी त्यांच्या कौशल्याचे दर्शन घडवले आणि माहितीपूर्ण आदानप्रदानात सहभाग घेतला. अंतिम फेरी गुरूग्राम येथे घेण्यात आली. सॅमसंगच्या नैऋत्य आशिया विभागाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क यांच्यासमवेत सॅमसंग इंडियाचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

“सॅमसंगमध्ये आम्ही जे काही करतो, त्याच्या मुळाशी नवोन्मेष असतो. गेल्या अनेक वर्षांपासून सॅमसंग एजने सातत्याने विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण केले आहे, ग्राहकांचा अनुभव उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील सोल्यूशन्सना मंच देऊ केला आहे. यावर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसाद व सहभागामुळे आम्हाला अत्यंत आनंद झाला. अधिकाधिक विद्यार्थी व शिक्षणसंस्था यात सहभागी होत आहेत हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. या तरुणांच्या मनात जोमाने वाढणारे नवोन्मेषाचे व समस्या-निवारणाचे चैतन्य बघणेही रोमांचक अनुभव होता,” असे सॅमसंग नैऋत्य आशिया विभागाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्हणाले.

एक्सएलआरपी जमशेदपूरमधील टीम आरएसपी राष्ट्रीय स्तरावर विजयी झाली. ग्राहक संवादाला चालना देण्यासाठी त्यांनी केलेली नवोन्मेष्कारी व्यूहरचना परीक्षकांवर छाप पाडून गेली. आरएसपीच्या कल्पनेमध्ये ब्रॅण्ड मॅस्कॉट्सचा वापर करणे, जेन एमझेड हॉटस्पॉट टॅगिंग व मॉल अ‍ॅक्टिवेशन्स यांचा समावेश होता. ग्राहकांशी अधिक खोलवर संबंध तयार करणे आणि नवोन्मेष्कारी, स्थानिकीकृत व व्यक्तिनुरूप अनुभवांच्या माध्यमातून ग्राहक संवादाला चालना देणे या दृष्टीने हे सोल्यूशन तयार करण्यात आले होते.

प्रांजली भाटिया, सिद्धार्थ द्विवेदी, रोहन भारद्वाज यांच्या टीमला ४५०,००० रुपयांचे रोख बक्षीस, सॅमसंगचे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आणि सॅमसंगकडून प्री-प्लेसमेंट ऑफर देण्यात आली.

स्मार्ट होम बाजारपेठेसाठी धोरण विकसित करणारी एक्सएलआरआय जमशेदपूरमधील टीम चेव्ही67 प्रथम उपविजेती ठरली. वापरकर्त्याला खरेदीच्या प्रवासात मार्गदर्शन करणारी जागतिक स्तरावरील अनुभवाला शिस्तबद्ध करणारी एक आतून जोडलेली, भविष्यकाळासाठी सज्ज परिसंस्था तयार करणे व तिच्या स्वीकृतीला चालना देणे यावर त्यांच्या प्रस्ताविक कल्पनेचा भर होता. अपूर्वा मित्तल, छायन बॅनर्जी, शुभम त्रिपाठी यांच्या टीमला ३००,००० रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.

कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडच्या टीम फिनिक्सने द्वितीय उपविजेतेपद प्राप्त केले. अनुभवाधारित रिटेल व्यवहार व शाश्वतता यांमार्फत ब्रॅण्ड एंगेजमेंट उंचावण्याच्या उद्देशाने त्यांनी मांडलेल्या भविष्यकालीन कल्पनांमध्ये ‘स्पिन टू विन’ स्मार्ट क्यूआर कोड्स, शाश्वत डिझाइनसह अमर्याद अनुभव यांचा समावेश होता. नवोन्मेष्कारी मार्केटिंग व उत्पादन व्यूहरचनांचा लाभ घेऊन ग्राहकांसोबत दृढ संबंध तयार करणे व त्यासोबतच जागतिक ग्राहकवर्गाला भविष्यकालीन अनुभव मिळतील याची खात्री करणे हा त्यांचा कल्पनेचा गाभा होता. वरुण गोयल, उमंग जैन आणि सक्षम जैन यांच्या टीमला १५०,००० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.

यंदा ५७१३ टीम्सनी सॅमसंग एजसाठी नोंदणी केली, त्यातील १४३२ टीम्सची कॅम्पस राउंडसाठी निवड झाली, या फेरीत त्यांनी संशोधन व कल्पना यांच्या माध्यमातून एग्झिक्युटिव केस समरी तयार केल्या. त्यानंतर तपशीलवार सोल्यूशन्स सादर करून व प्रस्तुत करून, ५९ टीम्स प्रादेशिक फेरीत पोहोचल्या. या समूहातील केवळ ८ आघाडीच्या टीम्स राष्ट्रीय फेरीत पोहोचल्या. त्यांना अंतिम कल्पना मांडण्यापूर्वी सॅमसंगमधील उच्चपदस्थांकडून प्रत्यक्ष मेंटॉरशिप देण्यात आली.

२०१६ मध्ये स्थापना झाल्यापासून सॅमसंग एज, देशातील सर्वोत्तम प्रतिभेला पुढे येण्याच्या व आपल्या करिअरची उत्तम सुरुवात करण्याच्या दृष्टीने अर्थपूर्ण माहितीचे आदानप्रदान करण्याची संधी देणारा, भारतातील अशा प्रकारचा पहिलाच कॅम्पस प्रोग्राम म्हणून विकसित झाला आहे.

Web Title: Samsung edges ninth edition receives overwhelming response over 15000 students participate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 06:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.