आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारला; 'ही' असतील आव्हाने
भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला आहे. मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून काम पाहणार आहेत. 11 डिसेंबर 2024 रोजी संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित गव्हर्नर म्हणून आरबीआयच्या मुख्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मंद विकास दर आणि उच्च महागाई दर अशा दुहेरी आव्हानाचा सामना अर्थव्यवस्थेसमोर असताना ते मध्यवर्ती बँकेची जबाबदारी सांभाळणार आहेत.
३ वर्षांचा असेल कार्यकाळ
संजय मल्होत्रा यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला असून, त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. सोमवारी संध्याकाळी केंद्र सरकारने त्यांची सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली होती. आज त्यांनी माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.
धोनीची पत्नी साक्षी आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीण; आकडा वाचून अवाक् व्हाल!
Shri Sanjay Malhotra takes charge as the 26th Governor of Reserve Bank of India for the next 3 years w.e.f December 11, 2024#RBI #rbigovernor #sanjaymalhotra #rbitoday pic.twitter.com/aa7UdIcWIS
— ReserveBankOfIndia (@RBI) December 11, 2024
कशीये संजय मल्होत्रा यांची प्रतिमा
आपला कार्यभार स्वीकारण्यापूर्वी संजय मल्होत्रा यांनी मंगळवारी सांगितले होते की, 11 डिसेंबर रोजी आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते सर्व विचार समजून घेण्याचा आणि अर्थव्यवस्थेसाठी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतील. नवीन आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची प्रतिमा आहे. त्यांचा असा विश्वास आहे की केवळ देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे किंमती व्यवस्थापित करणे शक्य नाही, यासाठी सरकारी मदतीची देखील आवश्यकता आहे.
कधीकाळी कोट्यवधींचा मालक होता ‘हा’ खेळाडू; आज काढतोय एक हजार रुपयांमध्ये दिवस!
संजय मल्होत्रा बद्दल
राजस्थानमधील 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी मल्होत्रा यांना सार्वजनिक धोरणाचा तीन दशकांहून अधिक अनुभव असून, त्यांना पॉवर, फायनान्स आणि टॅक्सेशन यांसारख्या क्षेत्रात कौशल्य आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्यापूर्वी संजय मल्होत्रा अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत होते. याशिवाय, याआधी ते वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागाचे सचिव पदावर होते.