संजय मल्होत्रा असणार रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला स्वीकारणार पदभार!
संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवे गव्हर्नर म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. ते विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, 11 डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील. संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे. सध्या ते महसूल सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
संजय मल्होत्रा यांच्याकडे वित्त आणि करनिर्धारण या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. त्यांनी आयआयटी कानपूर आणि प्रिन्सटन विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या विस्तृत अनुभवाचा आरबीआयच्या आर्थिक धोरणांवर चांगला आणि सकारात्मक प्रभाव पाडेल, अशी अपेक्षा आहे.
1990 च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी
केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी आयएएस अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. संजय मल्होत्रा हे सध्या महसूल विभागाचे सचिव आहेत. त्यांची आता आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ येत्या 10 डिसेंबर 2024 ला समाप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता 1990 च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘हा’ आयपीओ गुंतवणूकदारांना मालामाल करणार; लिस्टिंगच्या दिवशीच होऊ शकतो इतका प्रॉफिट!
संजय मल्होत्रा येत्या 11 डिसेंबर 2024 पासून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी हाती घेणार आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या विस्तृत अनुभवाचा आरबीआयच्या आर्थिक धोरणांवर चांगला आणि सकारात्मक प्रभाव पाडेल, अशी अपेक्षा आहे.
संजय मल्होत्रा नेमके कोण आहेत?
संजय मल्होत्रा हे प्रशासकीय सेवेतेली मोठे नाव आहे. ते राजस्थान कॅडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाबाबतची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
संजय मल्होत्रा यांनी आपल्या आतापर्यंतच्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत उत्तम नेतृत्व क्षमता दाखवून दिली आहे. संजय मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत होते. याआधी त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले आहे.
संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात ते ज्या पदावर आहे त्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.