वर्ष अखेरीस शेअर बाजारात 'या' आयपीओचा धुमाकूळ; गुंतवणूकदारांना दिलाय दुप्पट नफा!
गुंतवणूकदारांच्या प्रतिक्षेचा काळ आता संपणार आहे. साई लाइफ सायन्सेसचा आयपीओ 11 डिसेंबर रोजी उघडणार आहे. या आयपीओसाठी 13 डिसेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. 3042 कोटी रुपयांच्या या टीएमजी-समर्थित आयपीओची किंमत 522 ते 549 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) सोमवारी २१ रुपये इतका होता.
अशाप्रकारे, ते 4.01 टक्के प्रीमियमसह 571 रुपयांमध्ये सूचीबद्ध केले जाऊ शकते. यापूर्वी तो 31 रुपयांच्या ग्रे मार्केट प्रीमियमवर उपलब्ध होता. अशा प्रकारे जीएमपी 10 रुपयांनी घसरला आहे. आयपीओमध्ये, जीएमपी म्हणजेच ग्रे मार्केट प्रिमियम म्हणजे औपचारिकपणे जाहीर केलेली शेअरची किंमत आणि अनौपचारिक बाजारपेठेतील व्यवहारातील फरक असतो.
(फोटो सौजन्य – Istock)
ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत 400 रुपये
जर आयपीओची इश्यू किंमत 100 रुपये आणि जीएमपी 300 रुपये असेल. तर ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत 400 रुपये असेल. अर्थात जर आयपीओपूर्वी ग्रे मार्केटमध्ये शेअर 400 रुपयांना विकला जात असेल, तर जीएमपी 300 रुपये आहे. त्याचप्रमाणे जर ग्रे मार्केटमध्ये शेअर 40 रुपयांना विकला जात असेल तर जीएमपी 60 रुपये आहे. ग्रे मार्केट हे अनौपचारिक बाजार आहे. ज्या ठिकाणी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी आयपीओ खरेदी किंवा विकले जातात.
आयकर भरला नाही? टेन्शन घेऊ नका… 31 डिसेंबरपर्यंत आहे मुदत, नाहीतर खावी लागेल तरुंगाची हवा
693.35 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न
साई लाइफ सायन्सेस ही फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी लहान रेणू नवीन रासायनिक घटक विकसित आणि तयार करते. सोप्या भाषेत सांगायचे तर ती फार्मास्युटिकल क्षेत्रासाठी म्हणजेच औषध उत्पादक कंपन्यांसाठी संशोधन आणि विकासात मदत करते. त्यांच्यासाठी उत्पादनापासून मूल्य शृंखलेपर्यंत एंड-टू-एंड सेवा प्रदान करते. सप्टेंबर 2024 मध्ये संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत, साई लाइफ सायन्सेसने 693.35 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न नोंदवले. जे गेल्या वर्षीच्या 656.8 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
सहा महिन्यांत 28.01 कोटींचा निव्वळ नफा
कंपनीने सहा महिन्यांत 28.01 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 12.92 कोटींचा तोटा झाला होता. 13 डिसेंबरपर्यंत बोलीसाठी खुल्या असलेल्या आयपीओअंतर्गत 3 कोटी 81 लाख शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जाणार आहेत. 50 टक्के समभाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असतील. 35 टक्के समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)