
SBI Funds Management IPO
SBI Mutual Fund IPO : आयपीओ बाजारात पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे. SBI IPO आणखी एक मोठा लिस्टिंग गेमचेंजर आणतोय. त्यासाठी गुंतवणूकदारांनी पैसे तयार ठेवण्याची सूचना बँकेकडून करण्यात आली आहे. SBI फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडसाठी IPO लाँच करायची तयारी करत आहे. SBI त्यामध्ये उपकंपनीतील 6.3% हिस्सा विकणार आहे. या निर्णयाला SBI च्या केंद्रीय मंडळाने मान्यता दिली आहे.
भारतातील सर्वात मोठी बँक SBI Mutual Fund IPO लवकरच शेअर बाजारात एक गुंतवणूक करणार आहे. एक सहायक कंपनी सूचीबद्ध करण्याची योजना आखत आहे. SBI फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड ही SBI म्युच्युअल फंडचे व्यवस्थापन केलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने कंपनीतील 6.3% हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला असून याची विक्री IPO द्वारे केली जाईल. त्यामुळे बँकेला हजारो कोटी रुपये भांडवल मिळेल. कराराचे मूल्य जवळपास 7,000 ते 8,000 कोटी रुपयांपर्यंत असू शकते.
हेही वाचा : Trump on Russia Crude Oil : ट्रम्प यांच्या रशियावरील निर्बंधाने लागला चीन-भारताकडून रशिया तेल खरेदीला ब्रेक
6 नोव्हेंबरला झालेल्या SBI केंद्रीय मंडळाच्या कार्यकारी समितीत हा प्रस्ताव मंजूर झाला. बँक एकूण 32 दशलक्ष 60 हजार इक्विटी शेअर्स विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेअर्स कंपनीच्या एकूण 6.3007 टक्के हिस्सेदारी आहे. भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड मॅनेजमेंट SBI फंड्स मॅनेजमेंट ही एक आहे. एसबीआय आणि फ्रान्सच्या अमुंडी अॅसेट मॅनेजमेंट यांचा संयुक्त उपक्रम आहे. जी एक एसबीआय म्युच्युअल फंड सांभाळते. ज्यामध्ये SBI कडे 63% भाग असून बाकीचा 37% भाग फ्रान्सच्या अमुंडी अॅसेट मॅनेजमेंटकडे आहे.
SBI कडे 2025 च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस फंडाची मालमत्ता ₹8.5 लाख कोटींपेक्षासुद्धा जास्त आहे. 8 दशलक्षाहून जास्त सक्रिय गुंतवणूकदार असून 250 हून अधिक फंड योजना हि बँक चालवते. गुंतवणूकदारांमध्ये आधार आणि योजना मूल्य या गोष्टींमुळे ती अव्वल स्थान मिळवते. एसबीआयने अजूनही आयपीओचा मूल्यांकन सांगितला नसला तरी बँकेचे मूल्यांकन व गुंतवणूकदारांचा विश्वास मात्र मजबूत आहे.
हा व्यवहार भारतातील मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील सर्वात मोठा आयपीओ असू शकतो. सीबीआय आणि स्टॉक एक्सचेंजला आधी आयपीओचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर केला जाईल. त्यानंतर सगळ्यावर मंजुरी मिळेपर्यंत 2026 च्या पहिल्या सहामाहीत लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.
या पूर्वीही एसबीआय बँकेने अनेक उपकंपन्यांमधील काही हिस्से विकून एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एसबीआय कॅपिटल मार्केट्ससह , एसबीआय कार्ड्स मधून लक्षणीय निधी गोळा केला होता. यावेळीचा आयपीओ केवळ एसबीआयसाठीच नव्हे तर संपूर्ण म्युच्युअल फंड क्षेत्रासाठी सर्वात मोठी संधी असून शकते. त्यामुळे लहान–मोठे गुंतवणूकदार या व्यवहारावर लक्ष ठेवून आहेत.