Trump's sanction on Russia Crude Oil (photo-social media)
Trump on Russia Crude Oil : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर काही निर्बंध लावले आहेत. त्यामुळे रशियन तेल खरेदीत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येत आहे. ज्यामुळे भारत आणि चीन सारख्या देशांनी रशियन तेल खरेदीला ब्रेक लावला आहे. अगदी किंमत कमी करूनही अनेक खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या निर्बंधांमुळे ब्रेंटच्या तुलनेत रशियन युरल्स क्रूडच्या किमती अजून खाली आल्याने ट्रम्प यांनी एका वारने ‘दोन घाव’ केल्याचे म्हंटले जात आहे. रशियन कंपनी ल्युकोइल आणि रोझनेफ्ट यांच्यावर लादलेल्या या निर्बंधांमुळे आशियातील तेल बाजारपेठ काही प्रमाणात विभागली गेली आहे. रशियाच्या तेल महसुलावर यामुळे मोठ्या प्रमाणात घट झाली असून नेमकं पुतीन भारताला भेट देण्यासाठी तयारीत असताना असे घडल्याने पुढे काय होईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेचा रशियावरील युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढला असून याचा थेट परिणाम भारत-चीन सारख्या बलाढ्य आशियाई देशांवर होताना दिसत आहे. याची पूर्वकल्पना असल्याने नोव्हेंबरमध्ये जास्तीचे तेल मागवून घेतले होते मात्र, डिसेंबरच्या महिन्यात रशियन तेल खरेदीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येईल. रशियाच्या प्रमुख युरल्स क्रूडची किंमत सध्या ब्रेंटच्या तुलनेत प्रति बॅरल सुमारे $2-4 स्वस्त झाले आहे.
ट्रम्प यांनी रशियावर लादले निर्बंध
अमेरिकेने अलिकडेच ल्युकोइल आणि रोझनेफ्ट या दोन रशियन तेल कंपन्यावर कडक निर्बंध लादून त्यांना 21 नोव्हेंबर पर्यंत सर्व व्यवहार थांबवण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम, मंगलोर रिफायनरी आणि भारत पेट्रोलियमसह रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या भारतीय कंपन्यांनी डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी रशियन तेलाच्या ऑर्डर थांबवल्या आहेत. ज्यामुळे 65% रशियन तेल आयातीत घट झाली.
अमेरिकेच्या निर्बंधांनंतर चीन-भारताच्या तेल कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी तात्पुरती स्थगित केली आहे. त्याचा परिणाम म्हणून ESPO मिश्रित तेल त्यामुळे चिनी बंदरांवर मोठ्या सवलतीत व्यापार करत आहे. यामुळे रशियन तेल बाजार आशियातील दोन भागात विभागला गेलाय. अशाप्रकारे, एकंदरीत मंजूर नसलेल्या कंपन्यांचे जास्तीच्या किंमतीने विकले जात आहे. तर, मंजूर कंपन्यांचे तेल मोठ्या सवलतीत विकले जात आहे. जर हीच प्रवृत्ती राहिली तर रशियाच्या तेल महसुलावर याचा गंभीर परिणाम होईल.
हेही वाचा : Zomato-Blinkit चा मोठा निर्णय! ६,००० हून अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना मिळणार सरकारी योजनांचे फायदे
रशिया राष्ट्राध्यक्ष पुतिन येणार भारत दौऱ्यावर
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार असतानाच रशियन तेल खरेदीत ही घसरण झाली आहे. या भेटीदरम्यान ऊर्जा व्यापार तसेच, पेमेंट व्यवस्थेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, अमेरिकेकडून होणाऱ्या सततच्या दबावाने आशियाई बाजारपेठात रशियासाठी अनेक आव्हान तयार होऊ शकतात.






