Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका झटक्यात शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे 3.1 लाख कोटी बुडाले; वाचा… नेमकी का झाली घसरण!

Share Market Fall : 17 ते 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमेरीकी फेडरल रिझर्व्ह बॅंकेच्या बैठकीची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये व्याजदर कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अशातच अमेरिकने शेअर बाजाराने मोठी आपटी खाल्ली आहे. ज्याचा परिणाम आज देशभरातील शेअर बाजारात आला असून भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 700 अंकांनी तर निफ्टी 200 अंकांनी घसरलेला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 04, 2024 | 02:44 PM
एका झटक्यात शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे 3.1 लाख कोटी बुडाले; वाचा... नेमकी का झाली घसरण!

एका झटक्यात शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे 3.1 लाख कोटी बुडाले; वाचा... नेमकी का झाली घसरण!

Follow Us
Close
Follow Us:

बुधवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी घसरणीचा राहिला आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडताच, ९ वाजून १५ मिनिटांनी सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टी देखील 200 अंकांनी घसरलेला दिसून आला. ज्यामुळे एकाच झटक्यात गुंतवणूकदारांचे तब्बल 3.1 लाख कोटींचे नुकसान झाले. विशेष म्हणजे बाजार दुपारपर्यंत मंगळवारच्या तुलनेत घसरणीसह व्यवहार करत होता. ज्यामुळे आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी निराशेचा ठरला आहे.

नेमकी का खाल्ली शेअर बाजाराने आपटी

अमेरिकेमध्ये उत्पादन क्षेत्रात घट झाल्याने पुन्हा एकदा मंदीची शक्यता वाढली आहे. ज्यामुळे अमेरिकी शेअर बाजारासह जागतिक बाजारात त्याचा प्रभाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे भारतीय शेअर मंगळवारी फ्लॅट स्थितीत बंद झाला होता. मात्र, अमेरिकी शेअर बाजाराने मोठी आपटी खाल्ल्याचे समोर येताच, आज सकाळी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला आहे. विशेष म्हणजे ही आपटी इतकी मोठी होती की, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत भारतीय शेअर बाजार सावरू शकलेला नव्हता.

17 ते 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये व्याजदर कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – टाटा समुहाचा ‘हा’ शेअर घेणार मोठी उसळी? आत्ताच खरेदी करा… मिळणार तब्बल 23 टक्क्यांपर्यंत परतावा!

भारतीय शेअर बाजारात आज आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. याशिवाय अन्य अनेक शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. ज्यामुळे आज शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 3.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 3.1 लाख कोटी रुपयांनी घसरून, 462.4 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली घसरले आहे.

कोणत्या शेअर्समध्ये झाली आज घसरण

आज मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्सवरील बहुतांश शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे यात एशियन पेंट्स, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्हचे फक्त तीन समभाग ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस सारखे आयटी शेअर्स 1.25 टक्क्यांपर्यंत घसरले. जेएसडब्ल्यू स्टील सर्वात जास्त 2 टक्क्यांनी घसरला. एल अँड टी, टाटा स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, ॲक्सिस बँक, एसबीआय या शेअर्समध्ये प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

दरम्यान आज दुपारी शेवटचे वृत्त हाती आले. तोपर्यंत मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स मंगळवारच्या तुलनेत ३४१.५० अंकांच्या घसरणीसह ८२,२१३.९४ अंकांवर व्यवहार करत होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी हा मंगळवारच्या तुलनेत १२२.१० अंकांच्या घसरणीसह २५,१५७.७५ अंकांवर व्यवहार करत होता.

Web Title: Share market investors lost 3 1 lakh crores in a moment know why share market fall down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 02:41 PM

Topics:  

  • share market

संबंधित बातम्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
1

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी
2

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा
3

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या
4

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.