टाटा समुहाचा 'हा' शेअर घेणार मोठी उसळी? आत्ताच खरेदी करा... मिळणार तब्बल 23 टक्क्यांपर्यंत परतावा!
टाटा समुहाची दिग्गज कंपनी टाटा टेक्नोलॉजीजच्या शेअरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी असलेल्या टाटा टेक्नोलॉजीजच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. आज (ता.३) शेअर बाजारात हा शेअर २ टक्के वाढीसह 1074.70 अंकांवर व्यवहार करताना आढळून आला. अशातच आता हा येत्या काळात देखील दमदार परतावा मिळवून देणार असल्याचे शेअर बाजारातील तज्ञांकडून सांगितले जात आहे.
तब्बल 23 टक्क्यांपर्यंत परतावा मिळणार
शेअर बाजारातील तज्ञांच्या माहितीनुसार, टाटा समुहाच्या टाटा टेक्नोलॉजीज कंपनीचा शेअर 23 टक्क्यांपर्यंत जोरदार परतावा मिळवून देऊ शकतो. असे सांगितले जात आहे. तर आयसीआयसीआय सिक्युरिटीजने देखील टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअरवर BUY रेटिंग कायम ठेवले आहे. तसेच, प्रति शेअर लक्ष्य किंमत 1290 रुपये ठेवण्यात आले आहे. 2 सप्टेंबर 2024 रोजी शेअर 1050 रुपयांवर सेटल झाला आहे. जो सध्याच्या किमतीपासून येत्या काही दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना 23 टक्के इतका मजबूत परतावा मिळवून देऊ शकतो. अशी शक्यता आयसीआयसीआय सिक्युरिटीजने व्यक्त केली आहे.
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात उतरण्याचा फायदा होणार
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, टाटा टेक्नोलॉजीजला आयसीईमधून इलेक्ट्रिक वाहन उद्योगात उतरण्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल्समध्ये बॅटरीच्या नेतृत्वाखाली रूपांतरण वाढवण्यासोबतच कंपनी टाटा टेक स्मार्ट उत्पादन, वनस्पती अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर आधारित वाहने अर्थात रोबोटिक्स, एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) अंमलबजावणी आणि बॅटरी सोल्यूशन्समध्ये पारंगत आहे. त्यामुळे येत्या काळात कंपनीला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
याशिवाय ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्सिअलने देखील टाटा टेक्नोलॉजीजचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर जेएमकडून प्रति शेअर लक्ष्य किंमत 1250 रुपये ठेवण्यात आले आहे. जेएम फायनान्सिअलने येत्या काळात हा शेअर गुंतवणूकदारांना तब्बल 20 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देऊ शकतो, असे म्हटले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)