Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PNG Reva Diamond IPO: पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेडचा आयपीओ बाजारात चमकला; १५ नव्या दालनांकडे वाटचाल

भारतीय दागिन्यांच्या बाजारातील एक प्रतिष्ठित नाव असलेल्या पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेडचे आयपीओ बाजारात दमदार पाऊल टाकले आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 25, 2026 | 11:45 AM
PNG Reva Diamond IPO: पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेडचा आयपीओ बाजारात चमकला; १५ नव्या दालनांकडे वाटचाल (फोटो-सोशल मीडिया)

PNG Reva Diamond IPO: पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेडचा आयपीओ बाजारात चमकला; १५ नव्या दालनांकडे वाटचाल (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

PNG Reva Diamond IPO: भारतीय दागिन्यांच्या बाजारातील एक प्रतिष्ठित नाव असलेल्या पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेडचे आयपीओ बाजारात दमदार पाऊल टाकले आहे. पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमित मोडक यांनी आयपीओची प्रक्रिया, मूल्य निर्धारण आणि भविष्यातील कंपनीच्या विस्तार योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा केली. अमित मोडक यांनी सांगितले की, आयपीओ बाजारात आणणे ही कोणत्याही कंपनीसाठी एक दीर्घ प्रक्रिया असते.

त्यात डीआरएचपी बनविण्यापासून ते सेबीची मंजूरी, गुंतवणुकदार बँकर्सशी समन्वय आणि आरएचपी दाखल करण्यापर्यंतचे अनेक टप्पे असतात. ते म्हणाले, पीएनजीएस रेवाने आपला प्राइस बॅन्ड ३६७ रुपयांपासून ३८६ रुपयांच्या मधे ठेवला आहे. हे मूल्य एंटरप्राइज मूल्य आणि संस्थागत गुंतवणुकदारांच्या मागणीच्या आधारे निश्चित करण्यात आले आहे. मोडक यांनी सांगितले की, बाजाराची तात्कालिक स्थिती पाहून गुंतवणुकदार बहुतेकवेळा घाबरून जातात.

हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

 मात्र, कंपनीच्या व्यवस्थापनाचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ते बाजाराची स्थिती नव्हे तर आपल्या व्यवसायाला ट्रॅक करतात. शेअर बाजारात मिनिटामिनिटाला होणाऱ्या बदलांचा आयपीओच्या निर्णयावर प्रभाव पडत नाही. कारण कंपनीचे लक्ष्य दीर्घकालिक विकास हेच आहे. बाजाराची अवस्था खराब जरी असली तरी कंपनी आपली क्षमता आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची आशा करते.

पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेड भारतातील वेगवेगळ्या भागात ग्रॅन्डची ओळख आणि दृष्यमानता वाढविण्यासाठी १५ नवी दालने (स्टोअर्स) सुरू करण्याची आणि त्यांच्या जाहिरातींची योजना तयार करीत आहे. अमित मोडक म्हणाले की, आगामी २४ ते ३० महिन्यांच्या आत १५ नवी दालने सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. ही दालने मुख्यतः महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी केंद्रित असतील. महाराष्ट्रात कंपनीची पकड आधीपासूनच मजबूत आहे. त्यामुळे तेथे फुटफॉल (ग्राहकांचे स्टोअर्समध्ये येणे) वाढवणे सोपे जाईल, तर उत्तर भारतातील विस्तारासाठी कंपनी आपल्या १९० वर्षांच्या कॉर्पोरेट प्रमोटरच्या उज्ज्वल परंपरा आणि विश्वासार्हतेचा लाभघेईल, असे मोडक म्हणाले.

हे देखील वाचा: Stock Market Today: गिफ्ट निफ्टीत तेजीचे संकेत! बाजारात सकारात्मक सुरुवात होणार, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

या दालनांमध्ये ‘स्टडेड ज्वेलरी’ म्हणजेच हिरे आणि मौल्यवान रत्नजडीत दागिन्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, असेह मोडक म्हणाले, कंपनी आपला आवाका वाढविण्यासाठी आणि ‘ब्रँड रिकॉल’ मजबूत करण्यासाठी रणनीतीवर काम करीत आहे. आपल्या ‘फ्लॅगशिप ब्रेड’ ‘रेवा’च्या दीर्घकालीन वाढीसाठी जास्ती जास्त’ ब्रेड-एक्सक्लूसिव स्टोअर्स सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे, असा कंपनीचा दृष्टिकोन आहे. आर्थिक वर्ष २०२३ ते २०२५ दरम्यान कंपनीच्या नफ्यात महत्वपूर्ण वाढ दिसते आहे.

सप्टेंबर २०२५ पर्यंतचे आकडे सांगतात की, कंपनीचे भांडवल आणि निव्वळ नफा या दोन्हीत चांगली वाढ दिसते आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे ‘स्टडेड ज्वेलरी’कडे ग्राहकांचा वाढता ओढा हे आहे. केअर रिपोर्ट आणि उद्योगाचा कल सांगतो की, भारतात आता ग्राहक केवळ सोन्याच्या दागिन्यांपुरते मर्यादित नाहीत; हिरा, पन्ना आणि माणिक यांसारख्या रत्नांची मागणीही आता वेगाने वाढते आहे. पीएनजीएस रेवा याच वाढत्या मागणीचा लाभ उठवित असंघटित बाजाराकडून संघटित बाजाराकडे होत असलेल्या बदलाचे नैतृत्व करू इच्छिते.

Web Title: Png reva diamond ipo pngs reva diamond jewellery limiteds ipo shines in the market moving towards 15 new showrooms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी गॅप-अपने उघडण्याची शक्यता; ‘या’ शेअर्सवर मिळू शकतो दमदार परतावा
1

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी गॅप-अपने उघडण्याची शक्यता; ‘या’ शेअर्सवर मिळू शकतो दमदार परतावा

Paytm New Update : कोर्टाच्या धक्क्यानंतर पेटीएमचा मास्टरस्ट्रोक! कर्मचाऱ्यांना दिलं 4.48 लाखांहून अधिक शेअर्सचं गिफ्ट
2

Paytm New Update : कोर्टाच्या धक्क्यानंतर पेटीएमचा मास्टरस्ट्रोक! कर्मचाऱ्यांना दिलं 4.48 लाखांहून अधिक शेअर्सचं गिफ्ट

Elon Musk Net Worth : संपत्ती गडगडली, जिथे होते पुन्हा तिथेच आले मस्क! 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा हुकला; नेमका कसा बसला ब्रेक?
3

Elon Musk Net Worth : संपत्ती गडगडली, जिथे होते पुन्हा तिथेच आले मस्क! 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा हुकला; नेमका कसा बसला ब्रेक?

Multibagger Stocks : मोठा धमाका! ₹20 पेक्षा स्वस्त शेअर्सनी दिला 6 महिन्यांत 198% पर्यंतचा रिटर्न; तुमच्याकडे आहे का यातला एखादा?
4

Multibagger Stocks : मोठा धमाका! ₹20 पेक्षा स्वस्त शेअर्सनी दिला 6 महिन्यांत 198% पर्यंतचा रिटर्न; तुमच्याकडे आहे का यातला एखादा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.