1 लाखाचे झाले 84 लाख रुपये; चित्रपट क्षेत्रातील या कंपनीने गुंतवणूकदारांना दिलाय मजबूत परतावा!
शेअर बाजारात कोणता शेअर उसळी घेईल याचा अंदाज बांधता येत नाही. आज ज्या शेअरची किंमत कमी आहे. तो उद्या गगनाला भिडण्याची शक्यता असते. अशाच एका कमी किमतीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. स्पंज आयर्न आणि पिग आयर्न उद्योगातील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी ऑफ स्टीलच्या शेअर्सची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी होती. मात्र, आज तो 1000 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
1977 मध्ये स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी स्पंज आयर्न, वीज निर्मिती आणि लोहखनिज खाणकामात तज्ज्ञ आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कोळसा आधारित स्पंज आयर्न उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅप 51400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीची स्थापना 1977 मध्ये झाली आहे.
5 वर्षात 10300 टक्के परतावा
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) आकडेवारीनुसार, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या शेअरची किंमत गेल्या 5 वर्षात 10300 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. 11 ऑक्टोबर 2019 रोजी या शेअरची किंमत 9.45 रुपये होती. जी शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी बीएसईवर 983.50 वर बंद झाली आहे. तर 13 ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर्स वधारून, 992 रुपयांवर गेला आहे. एखाद्याने 5 वर्षांपूर्वी शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि अद्याप शेअर्स विकले नाहीत, तर त्याची गुंतवणूक 10 लाखांपेक्षा जास्त झाली असती. त्याचप्रमाणे 50,000 रुपयांची गुंतवणूक 52 लाख रुपयांमध्ये आणि 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
एका महिन्यात 32 टक्के वाढ
बीएसईच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या शेअरची किंमत 32 टक्क्यांहून अधिक मजबूत झाली आहे. 2024 मध्ये आतापर्यंत शेअर्स 63 टक्क्यांनी वाढला आहे. बीएसईवर 9 ऑक्टोबर 2024 रोजी या शेअर्सने 1,005.10 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. प्रवर्तकांकडे कंपनीत 9 जुलै 2024 पर्यंत 63.49 टक्के हिस्सा होता.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)