93 हजारांचे झाले 4 कोटी 5 लाख रुपये; 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल!
अस्थिर व्यवहारादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी सलग चौथ्या दिवशी आज 4 डिसेंबरला वधारून बंद झाले आहे. मात्र, ही गती मर्यादित राहिली. सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकाच्या जवळपास 300 अंक खाली बंद झाला आहे. निफ्टीही जवळपास सपाट बंद झाला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आज 2 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) मिडकॅप निर्देशांक 0.11 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.83 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे.
बँकिंग, वित्तीय सेवा, रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
आजच्या व्यवहारादरम्यान बँकिंग, वित्तीय सेवा आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे ऑटो, एफएमसीजी आणि मेटल शेअर्समध्ये दबाव दिसून आला आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 110.58 अंकांच्या वाढीसह 80,956.33 वर बंद झाला. तर निफ्टी 10.30 अंकांच्या वाढीसह 24,467.45 वर बंद झाला आहे.
(फोटो सौजन्य – istock)
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना दिलाय छप्परफाड परतावा; रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी!
गुंतवणूकदारांनी कमावले तब्बल 2 लाख कोटी
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 4 डिसेंबर रोजी वाढून 455.59 लाख कोटी रुपये झाले आहे. जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवारी (ता.3) 453.52 लाख कोटी रुपये होते. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.07 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज तब्बल 2.07 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कितीये देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती; जे घेणार आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ!
कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले
मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स वाढीसह बंद झाले आहे. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.82 टक्के वाढ झाली आहे. यानंतर एनटीपीसी, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटनचे शेअर्स 1.41 टक्क्यांनी ते 1.01 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आहे. तर सेन्सेक्समधील उर्वरित 16 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले आहे. यामध्ये भारती एअरटेलचा शेअर 2.17 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरला. तर टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये 1.30 ते 1.61 टक्क्यांची घसरण झाली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)