'या' सरकारी कंपन्यांचे शेअर वधारणार; गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजने जारी केलीये लक्ष्य किंमत
रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी एजीआय इन्फ्रा लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्सनी 2677 टक्के परतावा दिला आहे. ज्यामुळे हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आला आहे. या उत्कृष्ट कामगिरीदरम्यान कंपनीने आपल्या शेअर्ससाठी स्टॉक स्प्लिट जाहीर केले आहे.
स्टॉक स्प्लिट का केला जातोय?
एजीआय इन्फ्रा लिमिटेडच्या बोर्डाने अलीकडेच स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली आहे. ही प्रक्रिया लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि शेअर्सची तरलता वाढवण्यासाठी केली जाते. स्टॉक स्प्लिट अंतर्गत, कंपनी एक विद्यमान शेअर लहान मूल्याच्या अनेक शेअर्समध्ये विभाजित करेल. ज्यामुळे त्यांची किंमत कमी होईल. यामुळे गुंतवणूकदार कमी किमतीत अधिक शेअर्स खरेदी करू शकतील.
(फोटो सौजन्य – istock)
उत्कृष्ट परतावा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास
गेल्या 4 वर्षांत, एजीआय इन्फ्राने 2677 टक्क्यांचा परतावा दिला आहे. याचा अर्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीत 4 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज त्याचे मूल्य सुमारे 27.77 लाख रुपये झाले असते. ही कामगिरी कंपनीची आर्थिक स्थिरता आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील तिची मजबूत पकड दर्शवते.
कितीये देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती; जे घेणार आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ!
रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी
एजीआय इन्फ्रा ही रिअल इस्टेट विकास प्रकल्पांमध्ये सक्रिय असलेली एक मोठी कंपनी आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातील मागणी वाढली आहे. हे कंपनीच्या वाढीचे प्रमुख कारण आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सुधारणा आणि सरकारने पायाभूत सुविधांचा विकास केल्याने हा उद्योग आणखी मजबूत झाला आहे.
शेअर विभाजनाचा फायदा गुंतवणूकदारांना
स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर शेअर्सचे ट्रेडिंग सोपे होईल. अधिक गुंतवणूकदार त्यात सहभागी होऊ शकतील. तज्ज्ञांच्या मते, स्टॉक स्प्लिटचा कंपनीच्या बाजार भांडवलावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी आणि विक्री करणे सोपे होईल. एजीआय इन्फ्रा लिमिटेडच्या कामगिरीवरून असे दिसून येते की, कंपनी केवळ रिअल इस्टेट क्षेत्रातच वाढत नाही तर गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावाही देत आहे. स्टॉक स्प्लिटच्या घोषणेनंतर, कंपनीच्या समभागांची तरलता आणि मागणीमध्ये काय बदल होतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)