Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षाच्या अखेरीस अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, वाचा… 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?

अदानी ग्रुपच्या काही कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगली वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 175 रुपयांनी वाढला असून, गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 31, 2024 | 05:18 PM
Adani Group ची मोठी घोषणा, या राज्यातद करणार 2.3 लाख कोटींची गुंतवणूक

Adani Group ची मोठी घोषणा, या राज्यातद करणार 2.3 लाख कोटींची गुंतवणूक

Follow Us
Close
Follow Us:

गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपसाठी 2024 या वर्ष चढ उताराचे राहिले आहे. या वर्षाच्या शेवटच्या दिवसात अदानी ग्रुपच्या 11 कंपन्यांपैकी 9 स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. अदानी उद्योग समुहाच्या 11 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. या पैकी 9 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. बाजार बंद होताना काही कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 7.26 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर आज 2585 रुपयांवर आहे. वेंचुरा सिक्युरीटीजने गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचा सल्ला दिल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक 7.26 टक्क्यांनी वाढला आहे. अदानी उद्योगसमुहाच्या कंपन्यांसाठी 2024 चा शेवट चांगला होताना दिसत आहे.

मंगळवारी 2024 मधील शेवटचे ट्रेडिंग सेशन होणार आहे. अदानी उद्योग समुहाच्या एकूण 11 पैकी 9 कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या स्टॉकमध्ये 7.26 टक्के तेजी पाहायला मिळते आहे. आज या कंपनीचा शेअर बाजार बंद झाला. तेव्हा 2585 रुपयांपर्यंत पोहोचला. आज या कंपनीच्या शेअरमध्ये 175 रुपयांची वाढ झाली आहे. अदानी टोटल गॅसच्या स्टॉकमध्ये 14.99 टक्क्यांची वाढ झाली असून, आज बाजार बंद झाला. तेव्हा शेअर 781.15 रुपयांवर आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये 101.85 रुपयांनी वाढ झाली आहे.

‘या’ संरक्षण कंपनीला केंद्र सरकारकडून मिळालेय 1,990 कोटींचे कंत्राट, शेअरवर दिसणार परिणाम!

11 पैकी किती स्टॉक्समध्ये तेजी

अदानी पॉवरच्या शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. आज अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 7.16 टक्क्यांची वाढ झाली असून, शेअर 543.05 रुपयांवर पोहोचला आहे. आज शेअरच्या दरात 36.30 रुपयांची वाढ झाली आहे. अदानी एनर्जी सोल्यूशन्सच्या शेअरमध्ये 2.53 टक्के तेजी होती. 20.40 रुपयांनी शेअर वाढून 826.35 रुपयांवर पोहोचला आहे. अदानी ग्रीन एनर्जी शेअरमध्ये 1.71 टक्क्यांची वाढ झाली असून आज 18 रुपयांची वाढ झाली. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 1072 रुपयांवर आहे.

एसीसी लिमिटेडटच्या शेअरमध्ये 5.70 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. अंबुजा सिमेंटच्या शेअरमध्ये देखील 1.45 रुपयांची घसरण झाली. एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली असून बाजार बंद झाला तेव्हा शेअर 164 रुपयांवर होता. संघी इंडस्ट्रीज आणि अदानी विल्मरच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

21 नोव्हेंबरला अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये मोठी घसरण

2024 हे वर्ष अदानी ग्रुपसाठी चढ उतार असणारं राहिलं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात गौतम अदानी यांच्यासह इतर 7 जणांर 2250 कोटींच्या लाचखोरीचे आणि फसवणुकीचे आरोप लावण्यात आले होते. अदानी ग्रुपनं हे आरोप फेटाळले होते. मात्र, त्या दिवसानंतर अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आणि अदानी ग्रीनच्या संचालकांनी अमेरिकेतली न्याय विभाग आणि अमेरिका सिक्युरीटीज अँड एक्सचेंज कमिशनचे लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप फेटाळले होते.

Web Title: Share market update adani group stocks increased adani enterprises share up by 175 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

Market Cap: टॉप 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 74 हजार कोटींनी वाढले, एचडीएफसी बँक ठरली अव्वल
1

Market Cap: टॉप 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 74 हजार कोटींनी वाढले, एचडीएफसी बँक ठरली अव्वल

Stock To Buy: ‘या’ 3 बँकिंग शेअर्समध्ये गुंतवा पैसे, 33% नफ्याची हमखास हमी!
2

Stock To Buy: ‘या’ 3 बँकिंग शेअर्समध्ये गुंतवा पैसे, 33% नफ्याची हमखास हमी!

NSE: आज 4 ऑक्टोबरलाही उघडणार शेअर बाजार, वाचा Schedule, Timing; होणार मॉक ट्रेडिंग सेशन
3

NSE: आज 4 ऑक्टोबरलाही उघडणार शेअर बाजार, वाचा Schedule, Timing; होणार मॉक ट्रेडिंग सेशन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर
4

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.