Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुडत्या बाजाराला SIP चा आधार! Share Market मध्ये येणारे वादळ थांबले

२०२५ मध्ये FII ने ६९,०८० कोटींची मोठी विक्री केल्याने बाजारात ३% घसरण झाली, परंतु SIP गुंतवणुकीमुळे बाजार स्थिर राहिला. एडलवाइस म्युच्युअल फंडच्या राधिका गुप्ता यांनी SIP ला बचतीसोबत विकासाचे प्रभावी साधन मानले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 28, 2025 | 07:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

२०२५ मध्ये भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत जवळपास ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांची (FII) मोठ्या प्रमाणातील विक्री आहे. गेल्या ५ महिन्यांपासून एफआयआय बाजारातून पैसे काढत आहेत. २४ जानेवारीपर्यंत त्यांनी बाजारातून तब्बल ६९,०८० कोटी रुपये बाहेर काढले आहेत. हे २०२३च्या एकूण रकमेच्या चारपट अधिक आहे. याचा अर्थ, जेवढी रक्कम एफआयआय ने एकूण वर्षभरात बाजारातून काढली होती, तेवढी रक्कम त्यांनी काही महिन्यांतच काढली आहे.

राज्यात दहा हजार पदांसाठी मेगा पोलीस भरती; जाणून घ्या भरतीच्या प्रक्रियेविषयी

या विक्रीने बाजारावर मोठा परिणाम होणे अपेक्षित होते, पण भारतीय लहान गुंतवणूकदार SIP च्या माध्यमातून बाजारातील स्थिरता टिकवून ठेवत आहेत. लहान बचतीसाठी SIP एक उत्तम पर्याय आहे. एडलवाइस म्युच्युअल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी SIP च्या फायद्यांवर प्रकाश टाकला आहे. त्या म्हणाल्या, “SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घकालीन फायदा होतो. बाजार सरासरी परतावा देत असला तरी, १० वर्षांच्या SIP गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकतो.” मासिक SIP योगदान सध्या २६,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या SIP चे सामूहिक विश्वास बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

राधिका गुप्ता यांचे असे मत आहे की आज कोट्यवधी सामान्य गुंतवणूकदार SIP चा वापर करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. हा सामूहिक विश्वास दरमहा २६,००० कोटी रुपयांच्या SIP योगदानातून दिसून येतो. याच सामूहिक विश्वासामुळे FII च्या विक्रीदरम्यान भारतीय भांडवली बाजार स्थिर राहतो. यावर राधिका गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्‍स’ वर लिहिताना सांगितले, “आज, कोट्यवधी सामान्य गुंतवणूकदार SIP चा वापर करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. हा सामूहिक विश्वास दरमहा २६,००० कोटी रुपयांचा आहे आणि याच सामूहिक विश्वासामुळे FII च्या विक्रीदरम्यान भारतीय बाजार स्थिर राहतो.”

SIP ने भारतीय रिटेल इक्विटी संस्कृती जलदगतीने निर्माण केली आहे. हे असं साधन आहे, जे अनेक देश अजूनही करू शकलेले नाहीत. पूर्वी इक्विटी बाजाराला फक्त सट्टेबाजार मानले जात होते, पण आज सामान्य लोक नियमित बचत करून मोठे SIP पोर्टफोलिओ तयार करत आहेत. SIP ला बळकट समर्थन मिळाल्याने अनेक भारतीय गुंतवणूकदार आपल्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करत आहेत.

कुणाचं नाव चिकन तर कुणाचं बॅटमॅन; जगातील विचित्र नावांची विद्यापीठे, वाचाल तर पोट धरून हसाल

राधिका गुप्ता यांनी SIP ला “बचतीसोबत विकासाचे एक सोपे समाधान” मानले असून, हे भारतीय बचतीसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, असं त्यांचे मत आहे. ते म्हणाल्या, “SIP हे भारतीय बचतीसाठी एक महत्त्वाचे समाधान आहे. याला उपहास नाही, तर उत्सवाची गरज आहे. म्युच्युअल फंड आणि SIP यावर टीका करणारे लेख आणि गुंतवणूकदारांना अज्ञानी समजणारे दृषटिकोन काहीही उपयोगाचे नाहीत.” SIP ने केवळ गुंतवणुकीच्या गरजा पूर्ण केल्या आहेत, तर सामान्य भारतीय लोकांना नियमित बचत करण्याचा योग्य मार्ग दिला आहे. यामुळे बाजाराची स्थिरता कायम राखली गेली आहे आणि भविष्यातही भारतीय शेअर बाजारात चांगला विकास होण्याची आशा आहे.

Web Title: Sip supports the sinking market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • Bombay Stock Exchange

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.