Mega Police Recruitment For Ten Thousand Posts In The State
राज्यात दहा हजार पदांसाठी मेगा पोलीस भरती; जाणून घ्या भरतीच्या प्रक्रियेविषयी
महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून दहा हजार पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीच्या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचून काढा.
महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीला सुरुवात केले जाणार आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही या पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात या भरती संबंधित आणखीन खोलवर:
पोलीस भरतीच्या माध्यमातून १०,००० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत या जागा भरल्या जाणार असून इच्छुक उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र तसेच इच्छुक आहात तर लक्षात घ्यावे की भरतीची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. तसेच मैदानी टप्पा पावसाळ्याआधी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उमेदवारांना अर्ज करण्या अगोदर काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहेत. हे पात्रता निकष पोलीस भरती असल्या कारणाने शारीरिक स्वरूपाच्या आहेत. या भरती संबंधित जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना त्या जाहिरातीचा आढावा घेता येणार आहे. तसेच या भरती संदर्भात अधिक माहिती आणि सखोल माहिती अभ्यासता येणार आहे.
पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान १६५ सेंटीमीटर तर महिला उमेदवारांसाठी किमान १५५ सेंटीमीटर निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय पुरुष उमेदवारांची छाती किमान ७९ सेंटीमीटरपेक्षा जास्त असावी, अशी अट घालण्यात आली आहे. पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही सदृढ राहणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेत तीन महत्त्वाचे टप्पे असणार आहेत. यामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा समावेश आहे. उमेदवारांनी या सर्व टप्प्यांमध्ये पात्र ठरून अंतिम नियुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा मजबूत अंमल ठेवण्यासाठी अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळेच राज्य सरकारने पोलीस भरतीची ही प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त पदे भरली जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास विलंब न करता अर्ज करावा. पोलीस दलामध्ये सेवा करण्याची संधी मिळवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे मानले जात आहे.
Web Title: Mega police recruitment for ten thousand posts in the state