Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Social Media Influencer: डिजीटल स्टार्स इन्‍फ्लूएंसर ठरतायत डोकेदुखी; ASCI चा धक्कादायक अहवाल

टॉप 100 डिजिटल स्‍टार्स'चे संशोधन करण्‍यात आले, 69 टक्‍के स्‍टार्स एएससीआय आणि सीसीपीए मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करत नाहीत असं सांगण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 07, 2025 | 03:18 PM
डिजीटल स्टार्स इन्‍फ्लूएंसर ठरतायत डोकेदुखी; ASCI चा धक्कादायक अहवाल

डिजीटल स्टार्स इन्‍फ्लूएंसर ठरतायत डोकेदुखी; ASCI चा धक्कादायक अहवाल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडीयावर रिल्सच्या माध्यमातून अनेक इन्‍फ्लूएंसरने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीआहे. विविध विषयांवर आधारित कटेंट तयार करुन काही एन्फुएन्सर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र आता यातले बरेच जण आता डोकेदुखी ठरत असल्याचं ASCI म्हणजेच अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने अहवालात म्हटलं आहे. अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय)ने टॉप इन्फ्लुएंसर कम्प्लायन्स स्कोअरकार्ड जारी केला आहे, ज्यामधून निदर्शनास आले आहे की भारतातील टॉप १०० डिजिटल स्टार्सपैकी ६९ टक्‍के सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसरसाठी मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहेत. डिजिटल मीडियामध्ये इन्फ्लुएंसर जाहिरातींसाठी एएससीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांसह (Guidelines for Influencers Advertising in Digital Media) सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्‍शन ऑथोरिटीच्या (सीसीपीए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार देखील कोणत्याही प्रत्‍यक्ष संबंधांच्या बाबतीत प्रमुख आणि चुकवू न शकणारे खुलासे अनिवार्य आहेत.

या संशोधनामध्‍ये सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100डिजिटल स्टार्स 2024  (Forbes India’s Top 100 Digital Stars 2024) मध्ये असलेल्या प्रभावकांच्‍या ब्रँड-प्रमोशन पोस्टचे विश्‍लेषण करण्‍यात आले. 110 दशलक्षहून अधिक फॉलोअर्सपर्यंत पोहोचलेल्या या प्रभावकांनी उद्योगातील ट्रेंड सेट केले आहेत आणि इतर प्रभावकांसाठी आदर्श आहेत. पण, या संशोधनामधील निष्‍पत्ती जाहिरात पारदर्शकतेतील चिंताजनक तफावतींवर प्रकाश टाकतात, ज्यामुळे प्रभावक मोहिमांमधील गैर-अनुपालन पद्धती दिसून येतात. या निष्‍पत्तींमध्ये जाहिरातदार, एजन्सी आणि प्रभावकांकडून नियामक परिणाम टाळण्यासाठी अनुपालन आवश्यकतांनुसार त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की सीसीपीए मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विशेषतः नमूद केले आहे की निर्धारित पद्धतीने प्रत्‍यक्ष संबंध उघड करण्यात अयशस्वी झाल्यास कायद्यानुसार कठोर दंड होऊ शकतो.

▪ ‘टॉप 100 डिजिटल स्‍टार्स’चे संशोधन करण्‍यात आले, 69 टक्‍के स्‍टार्स एएससीआय आणि सीसीपीए मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करत नाहीत
▪ टॉप प्रभावकांमुळे110 दशलक्षहून अधिक फॉलोअर्सना अज्ञात ब्रँड प्रमोशन्‍सचा सामना करावा लागला
▪ फॅशन, टेलिकॉम आणि पर्सनल केअर ही अनुपालन न करणारी टॉप क्षेत्रे
▪ एएससीआयच्‍या हस्‍तक्षेपानंतर एकूण 93 टक्‍के अनुपालन साध्‍य करण्‍यात आले, 7टक्‍के नियामकाकडे पाठवण्‍यात आले

या अहवालाची ठळक वैशिष्‍ट्ये:

● छानणी केलेल्या 100 पोस्टपैकी 29 टक्‍के पोस्टमध्ये पुरेसे खुलासे होते; 2 टक्‍के केसेस फेटाळण्यात आल्या, कारण प्रभावकांनी कोणताही महत्त्वाचा संबंध नसल्याचे पुरावे दिले. ६९ टक्‍के केसेसमध्ये, नॉन-डिस्‍क्‍लोजर उल्लंघनांची पुष्टी झाली.
● 56.8 टक्‍के उल्लंघनांमध्‍ये प्रकटीकरण लेबल नव्‍हते आणि 43.2 टक्‍के केसेससंदर्भात हॅशटॅगमध्ये डिस्‍क्‍लोजर करण्‍यात आले नाही आणि एएससीआय व सीसीपीए मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यकतेनुसार स्पष्टपणे प्रदर्शित करण्‍यात आली नाहीत.

● फॅशन आणि जीवनशैली (27.5 टक्‍के), टेलिकॉम उत्पादने (21.7 टक्‍के) आणि पर्सनल केअर (13 टक्‍के) क्षेत्रे ही तीन प्रमुख उल्लंघन करणारे क्षेत्रे म्हणून उदयास आली आणि 62 टक्‍के उल्लंघने झाली.
● एकूण, तपास केलेल्या प्रभावकांपैकी 93टक्‍के प्रभाावकांनी हस्तक्षेपानंतर एएससीआयच्या शिफारशींचे पालन केले.

एएससीआयच्या सीईओ आणि महासचिव मनिषा कपूर म्हणाल्या, “आमच्या संशोधनामधील निष्‍पत्तींमधून निदर्शनास येते की, पारदर्शकता आणि प्रेक्षकांच्या विश्‍वासाच्या तत्त्वांचे पालन करण्याचा दर अव्वल प्रभावकांमध्‍ये देखील निराशाजनक आहे. एजन्सी, प्रभावक व ब्रँड्सनी याची नोंद घेण्याची आणि ती योग्यरित्या पूर्ण करण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रभावक जाहिराती मुख्य प्रवाहातील जाहिरात बजेटला प्राधान्‍य देत असल्‍यामुळे जबाबदारी आणि अनुपालनाची मानसिकता तयार करण्यात या परिसंस्थेचे अपयश चिंताजनक आहे. प्रभावकांसह काम करणाऱ्या ब्रँड्सनी कायद्याचा आणि त्यांच्या प्रेक्षकांचा आदर करणाऱ्यांची निवड करण्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे, स्वतःच्या प्रतिष्‍ठेला महत्त्व देणाऱ्या प्रभावकांनी कायद्याचे उल्लंघन करण्यास सांगणाऱ्या ब्रँड्सविरुद्ध कारवाई करावी. आम्हाला आशा आहे की हा अहवाल प्रभावक, टॅलेंट एजन्सी आणि ब्रँड्समध्‍ये जागरूकता निर्माण करेल.”

या अहवालात संसाधनांची यादी देखील देण्यात आली आहे, जी प्रभावकांना नैतिक जाहिरात पद्धती राखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि कायद्यांशी अधिक चांगल्या प्रकारे परिचित होण्यास मदत करू शकतात.एएससीआय प्रभावक जाहिरातीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि 2021 मध्ये प्रभावक मार्गदर्शक तत्त्वे लाँच केल्यापासून 6000 हून अधिक केसेसवर प्रक्रिया केली आहे. एएससीआयने नुकतेच लिंक्डइन प्लॅटफॉर्मवरील प्रभावकांना त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यास सांगणारा एक सल्लागार नियुक्त केला आहे. याबाबतचा अहवाल एएससीआय वेबसाइटवर उपलब्‍ध आहे.

 

Web Title: Social media influencer digital stars become influencers headache shocking report by asci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 03:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.