
स्टॉक मार्केटची आठवडाभराची स्थिती (फोटो सौजन्य - iStock)
पुणे/प्रा. नंदकुमार कार्किडे: गेल्या दोन सप्ताहांमध्ये असलेली भारतीय शेअर बाजारांवरील प्रतिकूलता शनिवार १४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये थांबली. या सप्ताहात दोन्ही प्रमुख शेअर निर्देशांकांमध्ये उत्तम वाढ झालेली होती. अमेरिका भारत यांच्यातील व्यापारी करारामध्ये निर्माण झालेली सकारात्मकता त्याचप्रमाणे बिहारमध्ये एनडीएला मिळालेले घवघवीत यश या सर्वांचा परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या मानसिकतेवर झालेला होता. परिणामतः सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर निर्देशांकामध्ये १३४६.५ अंशांची किंवा १.६३ टक्क्यांची उत्तम वाढ होऊन तो अखेरीस ८४५६२.७८९ पातळीवर बंद इसलेला होता. त्याचप्रमाणे मिडकॅप निर्देशांकात ०.८९ टक्क्यांची तर स्मॉल कॅप निर्देशांकात ०.१४ टक्क्यांची उत्तम वाढ नोंदवली गेली. राष्ट्रीय शेअर बाजारावरील ५० प्रमुख कंपन्यांवर आधारलेला निफ्टी गेल्या सप्ताहामध्ये ४१७.७५ अंशांनी किंवा १.६४ टक्क्यांनी वर जाऊन २५९१०.०५ अंश पातळीवर बंद झाला.
कसा झाला व्यवहार
गेल्या सप्ताहात पाचही सत्रांमध्ये मध्यम ते उत्तम स्वरूपाचे व्यवहार झाले. प्रत्येक सत्राचा धावता आढावा घ्यायचा झाला तर सोमवार दिनांक १० नोव्हेंबर च्या पहिल्याच सत्रामध्ये वातावरण सकारात्मक राहिले, आधीच्या तीन सत्रातील घसरण या सत्रात थांबून मुंबई शेअर निर्देशांकामध्ये ३१९ अंशांची उत्तम वाढ झाली तर निफ्टी मध्येही ८२ अंशांची वाढ नोंदवली गेली होती. मंगळवार दि. ११ नोव्हेंबर च्या सत्रात तेजीच्या प्रभावापोटी मुंबई शेअर निर्देशांक आणखी ३३५ अशांनी वर गेला तर निफ्टी मध्येही १२१ अंशांची भर पडलेली होती. बुधवार दि. १२ नोव्हेंबर च्या सत्रामध्ये जोरदार वाढ झाली. या सत्रात मुंबई शेअर निर्देशांक ५९५ अंशांनी उसळला तर निफ्टी मध्येही १८१ अंशांची जोरदार वाढ झालेली होती.
Vi Share Market Update: 10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’, गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?
गुरूवारचा बाजार
गुरुवार १३ नोव्हेंबरच्या सत्रामध्ये वातावरण फारसे तेजीमय राहिले नाही. या सत्रात मुंबई शेअर निर्देशांकात केवळ १२ अंशांची तर निफ्टी मध्ये ३ अंशांची भर पडलेली होती. शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर च्या अखेरच्या सत्रामध्ये वातावरण पुन्हा एकदा उत्तम राहून मुंबई शेअर निर्देशांकामध्ये ८४ अंशांची तर निफ्टी मध्ये ३१ अंशांची वाढ नोंदवली गेली. एकंदरीत गेल्या सप्ताहामधील पाचही सत्रांमध्ये दररोज निर्देशांकात सातत्याने वाढ होत होती. एकाही सत्रामध्ये प्रतिकूल वातावरण राहिले नाही. गेल्या सप्ताहात अनेक प्रमुख कंपन्यांमध्ये पुढील प्रमाणे जोरदार वध घट झालेली होती.
कुठे वाढ तर कुठे गेला खाली
हिरो मोटोकॉर्पचा भाव ४.५८ टक्क्यांनी वाढून ५५३०.४० पातळीवर बंद झाला. कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा १५.७२% वाहून १,३९२.८३ कोटी रुपये झाला. ट्रेंट कंपनीचा भाव गेल्या सप्ताहात ५.०९ टक्क्यांनी घसरून ४,३८९.४५ रुपयांवर बंद झाला. कंपनीने सप्टेंबर तिमाहीत स्थिर कामगिरी नोंदवली. कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली होऊनही बाजाराची ही प्रतिक्रिया होती. एफ एस एन ई कॉमर्स वेंचर्स या कंपनीचा शेअर ५.८३ टक्क्यांनी वर जाऊन २५८.६० रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीच्या एकूण महसुलात व नफ्यामध्ये चांगली वाढ झालेली आहे.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचा भाव ०.४६ टक्क्यांनी खाली गेला आणि ४९.७५ रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३५.०९ टक्के घट नोंदवली आहे. टाटा मोटर्स मध्ये गेल्या सप्ताह २.९०% ची चांगली वाढ होऊन त्याचा भाव ३२१.६५ रुपयांवर बंद झाला. कंपनीने चालू वर्षांच्या दुसऱ्या तिमाही मध्ये ८६७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवला.
ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) कंपनीचा भाव १८.९६% इतका जोरदार खाली पडला. कंपनीची दुसऱ्या तिमाही मध्ये असमाधानकारक आर्थिक कामगिरी झालेली आहे. कंपनीचा भाव ३१८.२५ वर बंद झाला. नॅशनल अॅल्युमिनियम अर्थात नाल्को या कंपनीचा भाव गेल्या सप्ताहात ११.९० टक्क्यांनी उसळला व २६२.३५ रुपयांवर बंद झाला. कंपनीने गेल्या सहा महिन्यांमध्ये उत्तम आर्थिक कामगिरी नोंदवली आहे त्याचप्रमाणे सुधारित उत्पादन कार्यक्षमता व खर्चावर योग्य नियंत्रण मिळवल्याचा हा परिणाम होता. कंपनीला दुसऱ्या तिमाही मध्ये ४२९२.३४ कोटी रुपयांचा महसूल मिळालेला आहे. बजाज फिनसर्व्ह कंपनीच्या भावात १.८९ टक्क्यांची मोठी घसरण होऊन त्याचा भाव २०६४ रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीने चालू आर्थिक वर्षात उत्तम महसूल व दिवाळी कमवलेला आहे.
वोडाफोन आयडिया कंपनीचा भाव गेल्या सप्ताहात १३.८३ टक्क्यांनी उसळलेला होता व तो अखेरीस १०.९४ रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीच्या एकूण कामगिरी मध्ये खूप चांगली सुधारणा झालेली असून कंपनीच्या नफ्यातही उत्तम वाढ झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा कमी होऊन त्या उलट नफा गोदरेज इंडस्ट्रीज चा भाव ०.६८ टक्क्यांनी खाली घसरून १०६९.४० रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीच्या एकूण निव्वळ नफ्यात लक्षणीय घसरण झालेली आहे. मात्र एकूण महसूल समाधानकारकरीत्या वाढलेला आढळला. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये या सप्ताहात ६.३१ टक्क्यांची उत्तम वाढ होऊन त्याचा भाव १८५.९० रुपये पातळीवर बंद झाला, कंपनीचा निव्वळ नफा १९११.१९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच कंपनीच्या एकूण उत्पन्नातही चांगली वाढ झालेली आहे. झाल्यामुळे शेअर बाजारामध्ये या शेअरला चांगली मागणी आढळली.
ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये ५.८२ टक्क्यांची घसरण झाली व त्याचा भाव ५८०८.४५ रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण बेरी यांनी तात्काळ राजीनामा दिल्याचे वृत्त कंपनीने जाहीर केल्यानंतर बाजारात ही घसरण नोंदवली गेली. ऑइल अँड नॅचरल गैस कॉर्पोरेशन (ONGC) कंपनीचा भाव १.६६ टक्क्यांनी घसरला व २४७.७५ रुपयांवर बंद झाला. विद्युत दुचाकी वाहन क्षेत्रातील एथर एनर्जी कंपनीच्या भावात ०.६७ टक्क्यांची घसरण होऊन तो ८४०.३५ रुपयांवर बंद झाला. या कंपनीच्या बाजारातील विषयावर चांगला झाला.
Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला
सेन्सेक्स पातळी पोहोचली ८४,५६२ जवळ
एशियन पेंट्समध्ये या सप्ताहात १०.९९। टक्क्यांची जोरदार वाढ झाली व तो अखेरीस २९०६.४० रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीचा निव्वळ नफा जोरदार वाढून ९९३.५९ कोटी रुपयांवर पोचला आहे. डेटा पॅटर्न (इंडिया) कंपनीचा भाव १८.४५ टक्क्यांनी वाढून ३१०१.८० रुपयांवर बंद झाला. सनोफी कंझ्युमर हेल्थकेअर इंडिया (SCHIL) ने गेल्या सप्ताहात ३.४८ टक्क्यांची उत्तम वाढ नोंदवली व त्याचा भाव ४८२५ रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीची देशांतर्गत विक्री २० टक्क्यांनी वाढलेली असून करोत्तर नफा ६२.९ कोटी रुपयांवर गेलेला आहे. अपोलो टायर्स कंपनीचा
परिणाम झाला असून कंपनीची आर्थिक कामगिरी खूप समाधानकारक झालेली आहे. एसाब इंडियाने त्यांच्या भावपातळी १०.९९ टक्क्यांची जोरदार वाढ नोंदवली, कंपनीचा शेअर ५२९८.६५ रुपये पातळीवर बंद झाला. भारत फोर्जने त्याच्या भाव पातळीत ५.९३१% ची जोरदार वाढ नोंदवून तो अखेरीस १३९७.२५ रुपये पातळीवर बंद झाला. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत २३% वाढून २९९.२७ कोटी रुपये झाला, जो आर्थिक वर्ष २५ च्या दुसऱ्या तिमाहीत २४३.२९ कोटी रुपये होता.
भाव गेल्या सप्ताहात ०.५६ टक्क्यांनी वाढला व ५१८.९५ रुपयांवर बंद झाला. कंपनीचा एकूण निव्वळ नफा ६८३१.०९ कोटी रुपयांवर गेलेला आहे. एमआरएफ कंपनीचा भाव गेल्या सप्ताहात ०.८९० टक्क्यांनी खाली घसरला व १५७४३२.०५ रुपये पातळीवर बंद झाला. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा ५२५.६४ कोटी रुपयांवर गेला आहे तर एकूण महसूल ७३७८.७२ कोटी रुपयांवर गेलेले आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळांनी चालू आर्थिक वर्षासाठी ३ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केलेला आहे.
२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वार्षिक ९.३१% वाढून ४,०३१.१२ कोटी रुपये झाला, अतुल ऑटोने त्याच्या भाव पातळीत सप्ताहात ४.६२% वाढ नोंदवली व तो ४६६.२५ रुपयांवर बंद झाला. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा दुसऱ्या तिमाहीत ६९.५% वाढून ९.१७ कोटी रुपये झाला. ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत एकूण महसूल वाढून २००.१७ कोटी रुपये झाला.
(प्रस्तुत लेखक अर्थविषयक पत्रकार व पुणे शेअर बाजाराचे माजी संचालक आहेत.)