Bihar election results have a strong impact on the stock market! (फोटो-सोशल मीडिया)
Share Market Crash: शुक्रवारी भारतीय शेअर मार्केट उघडताच घसरल्याचे दिसत आहे. कारण जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि बिहार निवडणूक यांचा परिणाम शेअर मार्केटवर झालेला दिसत आहे. बिहार निवडणूक निकालांभोवतीची अनिश्चितता गुंतवणूकदारांवर याचा झालेला परिणाम स्पष्ट दिसत आहे. परिणामतः निफ्टी 50 निर्देशांक 25,801 वर 77 अंकांनी घसरला, तर सेन्सेक्स 231 अंकांनी खाली येऊन 84,247 वर उघडला. टाटा मोटर्सची तब्बल 3% घसरण झाली असून अजून बाकी कंपन्यांवर सुद्धा याचा विशेष परिणाम झाला आहे.
बिहार निवडणूकीच्या निकालांचा थेट प्रभाव
शुक्रवारी बिहार निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यावर इकडे संपूर्ण बाजाराचे चक्रच फिरले. शेअर मार्केटचे दार उघडताच मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. संपूर्ण बाजाराचे लक्ष या निकालांकडे वळले असून एक्झिट पोल्सनुसार एनडीएला आघाडीवर असल्याने राजकीय स्थिरतेची शक्यता वाढली असली तरी प्रत्यक्ष निकाल येईपर्यंत गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. शेअर मार्केट तज्ञांच्या मते, या निवडणुकींचा कदाचित बाजारावर अधिक काळ परिणाम होणार नाही. परंतु, सध्याच्या राजकीय घडामोडी नवीन काय वळण घेऊ शकते याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे बिहारचे निकाल केंद्रातील समतोलावर परिणाम करू शकतात, त्यामुळे गुंतवणूकदार स्थिर आहेत.
अमेरिका-भारत चर्चांचा गुंतवणूकदारांवर परिणाम
भारतातील घसरणीचा जागतिक बाजारपेठांमधील घसरण हा मोठा घटक आहे. महिन्यातील सर्वात मोठी घसरण म्हणून अमेरिकेत वॉल स्ट्रीट यांनी त्याची नोंद घेतली आहे. नॅस्डॅक 2.29% नी कोसळून 22,870.36 वर बंद झाला. तर, अमेरिकन सरकारच्या शटडाउनच्या भीतीमुळे नफा बुकिंग वाढली आणि बाजारात मोठा दबाव तयार झाला. आशियातील प्रमुख बाजारांनीही त्याचे प्रतिबिंब दाखवले. जपानचा निक्केई 225 निर्देशांक 1.85% ने घसरला तर दक्षिण कोरियाचा कोस्पी 2.29% खाली आला. यामुळे भारतीय बाजारावर अधिक नकारात्मक वातावरण निर्माण झाले.
गिफ्ट निफ्टीने बाजार उघडण्यापूर्वीच अशुभ संकेत दिले होते. डॉलर निर्देशांक 99.23 पातळीवर स्थिर असताना, तेलाच्या किमती सुरुवातीच्या व्यापारात वाढल्या पण आठवड्याच्या अखेरीस घसरणीची शक्यता असल्याने बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर तेल आणि सोने दोन्हीवर मंदीची छाया आहे, ज्याचा प्रभाव उभरत्या बाजारांवर होत आहे.
हेही वाचा : Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी
13 नोव्हेंबरला FIIs ने 383.68 कोटींची निव्वळ विक्री केली, तर DIIs यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करत 3,091.87 कोटींची गुंतवणूक केली. म्हणजेच, देशांतर्गत गुंतवणूकदार बाजारातील घसरणीचा फायदा घेत खरेदी वाढवत आहेत, तर परदेशी गुंतवणूकदार सावध राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका–भारत व्यापार चर्चा आणि जागतिक मॅक्रो संकेत हे आगामी दिवसांचे मोठे ट्रिगर्स ठरणार आहेत. बिहारचे निकाल एनडीएच्या बाजूने गेल्यास बाजारातील जोम वाढू शकतो, तथापि अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.






